जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस चौकीवर दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद

By Admin | Updated: October 8, 2016 12:50 IST2016-10-08T10:04:51+5:302016-10-08T12:50:52+5:30

जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील पोलीस चौकीवर शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

Terrorist attack on police post in Jammu and Kashmir, a police martyr | जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस चौकीवर दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस चौकीवर दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि.8- पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील पोलीस चौकीवर शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. हल्ला करुन दहशतवादी यानंतर पसार झाले. या परिसरात आता सर्च ऑपरेशन सुरू आहे. नाझीर अहमद असे शहीद झालेल्या पोलिसाचे नाव आहे, तर कॉन्स्टेबल झहूर अहमद यात जखमी झाले आहेत. रात्री साडे आठच्या सुमारास दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती एका पोलीस अधिका-याने दिली आहे. 
 
 
आणखी बातम्या:
भारत-पाक सीमा दोन वर्षांत सील!
बारामुल्लात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, तर एक जवान शहीद, अखेर चकमक थांबली
 
गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवर दहशतवादी हल्ले वाढले आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. यानंतर बारामुल्लामध्येही राष्ट्रीय रायफलच्या 46 या कॅम्पवर हल्ला केला, यात एक जवान शहीद झाला होता. यानंतर गुरुवारी हंदवाडामध्ये भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, ज्याला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
 

Web Title: Terrorist attack on police post in Jammu and Kashmir, a police martyr