काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस जवान शहीद, एका आतंकवाद्याचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 09:14 IST2020-10-20T09:12:12+5:302020-10-20T09:14:44+5:30

शोपिया जिल्ह्याच्या मेलहोरा परिसरात सुरक्षा दलांनी चौफेर सुरक्षा जवान तैनात केले आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांचे शोध मोहिम हाती घेतली असून एका दहशतावाद्याचा खात्मा करण्यात आलाय.

Terrorist attack martyred a policeman, one killed in jammu and kashmir anantnag | काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस जवान शहीद, एका आतंकवाद्याचा खात्मा

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस जवान शहीद, एका आतंकवाद्याचा खात्मा

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला असून एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळी झाडली. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यास रुग्णालयात नेताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून सुरक्षा दल तैनात झाले आहे. दुसरीकडे दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील मेलहोरा परिसरात आतंकवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. 

शोपिया जिल्ह्याच्या मेलहोरा परिसरात सुरक्षा दलांनी चौफेर सुरक्षा जवान तैनात केले आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांचे शोध मोहिम हाती घेतली असून एका दहशतावाद्याचा खात्मा करण्यात आलाय. सुरक्षा जवान घटनास्थळी पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. त्यानंतर, सुरक्षा दल आणि दहशवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून अद्याप त्याची ओळख पटली नाही. 

 

Web Title: Terrorist attack martyred a policeman, one killed in jammu and kashmir anantnag