शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; 7 डिसेंबर रोजी शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 4:53 PM

Who Will Be Telangana CM: तेलंगणा काबीज करण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांची महत्वाची भूमिका होती.

Revanth Reddy CM Face: नुकत्याच पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात काँग्रेसला चार राज्यात पराभवाचा सामना करावा लागला, पण तेलंगणात सत्ता काबीज केली. या विजयात महत्वाची भूमिका बजवणाऱ्या प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाले आहे. शपथविधीची पूर्ण तयारी करण्यात आली असून येत्या 7 डिसेंबर रोजी रेड्डी मुख्यमंत्रिपदाची शपत घेतील. इतर काही मंत्र्यांचाही शपथविधी होईल. 

न्यूज एजन्सी एएनआयच्या मते, हैदराबादमध्ये सीएलपीच्या बैठकीत रेवंत रेड्डींच्या नावे एकमत झाले, आता अंतिम निर्णय पक्षाच्या हाय कमांडवर सोडण्यात आला आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत रेवंत रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

रेवंत रेड्डींना पक्षातून विरोधदरम्यान,  रेवंत रेड्डी यांना पक्षातील काही नेत्यांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष एन उत्तम कुमार रेड्डी, भट्टी विक्रमार्का, माजी मंत्री कोमातिरेड्डी व्यंकटा रेड्डी, माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंह यांचा रेवंत रेड्डींना विरोध आहे. भ्रष्टाचाराची प्रलंबित प्रकरणे आणि रेड्डींच्या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या खराब कामगिरीकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

तेलंगणात काँग्रेसची कामगिरीतेलंगणात एकूण 119 जागांपैकी 64 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. तसेच, बीआरएसने 39, भाजपने 8 आणि एमआयएमने 7 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला 39.40 टक्के, बीआरएसला 37.35 टक्के आणि भाजपला 13.90 टक्के मते मिळाली. रेवंत रेड्डी यांनी कोडंगल विधानसभा मतदारसंघातून भारत राष्ट्र समिती (BRS) चे पी नरेंद्र रेड्डी यांचा 32000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. 

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी