शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : सुट्टी न घेता बजावत होती कर्तव्य, आई बनल्यानंतर आठवड्यातच झाला कोरोनामुळे अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 15:53 IST

CoronaVirus News : जवळपास 10 दिवसांपूर्वी त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांना हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ठळक मुद्देडॉ. फराह यांनी शादान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून एमबीबीएस केले आणि हैदराबादच्या निलोफर हॉस्पिटलममधून बालरोगशास्त्रात ( पीडियाट्रिक्स) एमडी केले होते.

हैदराबाद : तेलंगणामधील एका डॉक्टरची मुलाला जन्म दिल्यानंतर एका आठवड्यातच कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. हैद्राबादमधील जुन्या शहरातील प्रिंसेस एसरा हॉस्पिटलमधील 31 वर्षीय डॉक्टर फराह निलोफरचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. गजवेलमधील सरकारी हॉस्पिटलमधील डॉ. फराह या कोरोना साथीच्या काळात काम करत होत्या. तसेच, आपल्या सहकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेनंतरही त्यांनी प्रसूती रजेचा लाभ घेतला नाही. मात्र, अखेर आई बनल्यानंतर आठवड्यातच त्यांचा कोरोनामुळे अंत झाला.

आपल्या समर्पणासाठी परिचित असलेल्या डॉ. फराह बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) काम करत होत्या आणि कोविड लसीकरण कर्तव्यावरही होत्या. जवळपास 10 दिवसांपूर्वी त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांना हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ. फराह यांनी शादान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून एमबीबीएस केले आणि हैदराबादच्या निलोफर हॉस्पिटलममधून बालरोगशास्त्रात ( पीडियाट्रिक्स) एमडी केले होते.

(Corona Antibodies : कोरोना झाल्यानंतर किती महिने राहू शकतात अँटीबॉडीज? वाचा सविस्तर)

तीन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटरवर ठेवले होतेगजवेलमधील एरिया हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल एसोसिएट म्हणून तैनात होत्या. कोरोनामुळे तरुण डॉक्टरच्या मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. वारंगलमधील काकतीय मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक हेमा बिंदू यांच्या म्हणण्यानुसार, डॉ. फराह यांचे कोरोनामुळे निधन झाले. तीन दिवसांपूर्वीच त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते.

तेलंगाणामध्ये कोरोनामुळे २१ डॉक्टरांचा मृत्यूहेमा बिंदू म्हणाल्या की, ' डॉ. फराह एक अतिशय हुशार, गतिशील व उत्साही डॉक्टर आणि खूप समर्पित बालरोग तज्ज्ञ होत्या.' तेलंगणाने कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेत आतापर्यंत २१ डॉक्टर गमावले आहेत. दरम्यान, तेलंगणाच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा सुधारणांसाठी काम करणारी संस्था हेल्थकेअर रिफॉर्म्स डॉक्टर्स असोसिएशनने कर्तव्यावर असताना कोरोनामुळे बळी पडलेल्या सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना मदत करण्याची मागणी केली आहे.

(Corona Vaccine : कोरोनापासून बरे झाल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी लस?, वाचा एक्सपर्ट्सचे म्हणणे...)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTelanganaतेलंगणाdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल