Prashant Kishor Tamil Nadu Prediction: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जसा समोर आला तशी एका व्यक्तीची जोरदार चर्चा रंगली. ती व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आणि नेते प्रशांत किशोर. सुपरस्टार विजयचा तमिझागा वेत्री कझगम या पक्षाने तमिळनाडूमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. अशातच प्रशांत किशोर यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यांनी थलपती विजयच्या विजयाचे भाकित केले होते.
काय होती ती भविष्यवाणी?
सुमारे एक वर्षापूर्वी थंथी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी ठामपणे सांगितले होते की, "जर विजय तामिळनाडूत कोणत्याही युतीशिवाय एकला चलो रे भूमिकेतून लढला, तर त्याच्या विजयाची मोठी शक्यता आहे." जेव्हा पत्रकाराने त्यांना विचारले की, बहुमतासाठी लागणारा ११८ हा आकडा विजय गाठू शकेल का? तेव्हा किशोर आत्मविश्वासाने, हो नक्कीच, माझा हा व्हिडिओ तुम्ही जपून ठेवा आणि जेव्हा निकाल येतील तेव्हा पुन्हा एकदा चालवा, असं म्हणाले होते.
पीकेची रणनीती आणि विजयचा मास्टरस्ट्रोक
प्रशांत किशोर यांनी विजयला दोन महत्त्वाचे सल्ले दिले होते, जे विजयासाठी निर्णायक ठरले. कोणत्याही मोठ्या आघाडीत सामील न होता स्वतंत्रपणे २३४ जागांवर उमेदवार उभे करण्याचा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला होता. प्रशांत किशोर यांनी स्वतः बिहारमध्ये निवडणूक न लढवण्याची चूक केली होती, मात्र विजयने तसे न करता स्वतः दोन जागांवरून निवडणूक लढवली आणि आपल्या पक्षाला मोठा विजय मिळवून दिला.
दिग्गजांचे दावे फोल, पीके ठरले अचूक
बहुतेक एक्झिट पोल्सनी एम. के. स्टॅलिन यांच्या पुनरागमनाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, ४ मे च्या दुपारी जेव्हा आकडेवारी समोर आली, तेव्हा टीव्हीके १०० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी विजयच्या पक्षाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक मोठी सभा झाली होती. या सभेला प्रशांत किशोर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी विजयचं कौतुक करत, विजय हा तामिळनाडूसाठी आशेचा एक नवीन किरण आहे, असं म्हटलं होतं.
मैत्री आणि राजकारणात जुनी साथ
प्रशांत किशोर आणि विजय यांच्यातील ओळख पाच वर्षांपूर्वीची आहे. किशोर यांनी सांगितले होते की, आम्ही राजकीय सहकाऱ्यांपेक्षा जास्त चांगले मित्र आहोत. जरी प्रशांत किशोर जुलै २०२५ पासून विजयचे सल्लागार म्हणून अधिकृतपणे काम करत नव्हते, तरीही त्यांनी आखून दिलेल्या सुरुवातीच्या रणनीतीने विजयला सत्तेच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे.
तामिळनाडूच्या राजकारणात नवे पर्व
सध्याच्या आकडेवारीनुसार, विजय तामिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. भाजप आणि काही छोट्या पक्षांच्या मदतीने ते बहुमताचा आकडा सहज गाठतील, अशी चिन्हे आहेत.
Web Summary : Political strategist Prashant Kishor's old prediction about Thalapathy Vijay's victory in Tamil Nadu has gone viral. Kishor had predicted Vijay could win if he contested independently. Vijay's party achieved a historic victory, potentially making him the next Chief Minister with support from BJP.
Web Summary : राजनीतिक रणनीतिकार प्रशांत किशोर की थलापति विजय की तमिलनाडु में जीत के बारे में पुरानी भविष्यवाणी वायरल हो गई है। किशोर ने भविष्यवाणी की थी कि अगर विजय स्वतंत्र रूप से चुनाव लड़ते हैं तो वे जीत सकते हैं। विजय की पार्टी ने ऐतिहासिक जीत हासिल की, जिससे वह भाजपा के समर्थन से अगले मुख्यमंत्री बन सकते हैं।