एआय, लेझरचा थरार! 'होलोग्राम विजय'ने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 09:40 IST2026-04-14T09:39:10+5:302026-04-14T09:40:00+5:30

Tamil Nadu Assembly Election: तामिळनाडूतील राजकीय प्रचाराची व्याख्या बदलत 'तमिळगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने एक पाऊल पुढे टाकले आहे. कुंभकोनम मतदारसंघाचे उमेदवार विनोथ रवी यांनी चक्क अभिनेता ते राजकारणी बनलेले 'थलपती' विजय यांचा 'थ्री-डी होलोग्राम' प्रचारासाठी मैदानात उतरवला आहे.

Tamil Nadu Assembly Election: The thrill of AI, lasers! 'Hologram Vijay' attracts attention | एआय, लेझरचा थरार! 'होलोग्राम विजय'ने वेधले लक्ष

एआय, लेझरचा थरार! 'होलोग्राम विजय'ने वेधले लक्ष

चेन्नई -  तामिळनाडूतील राजकीय प्रचाराची व्याख्या बदलत 'तमिळगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने एक पाऊल पुढे टाकले आहे. कुंभकोनम मतदारसंघाचे उमेदवार विनोथ रवी यांनी चक्क अभिनेता ते राजकारणी बनलेले 'थलपती' विजय यांचा 'थ्री-डी होलोग्राम' प्रचारासाठी मैदानात उतरवला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हे तंत्रज्ञान सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

कुंभकोनम मतदारसंघात १२ एप्रिल रोजी या तंत्रज्ञानाने प्रचारकार्यात प्रवेश केला. एखाद्या प्रचार वाहनावरून विजय यांची हुबेहूब चालती-बोलती डिजिटल प्रतिमा मतदारांशी संवाद साधताना दिसत आहे. यामुळे विजय प्रत्यक्ष तिथे उपस्थित असल्याचा भास निर्माण होत असून, ही 'अभासी' प्रतिमा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

...अशी झाली निर्मिती
टीव्हीकेचे तंजावर जिल्हा खजिनदार विजय चंद्रन यांनी सांगितले की, "आमच्या नेत्याला सर्व २०० हून अधिक मतदारसंघांत प्रत्यक्ष जाणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आम्ही या तंत्रज्ञानाचा वापर केला. यामुळे आमचे नेते एकाच वेळी राज्याच्या कानाकोपऱ्यात मतदारांना प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव देऊ शकतात." राजकीय विश्लेषकांच्या मते, 'एआय-फर्स्ट' रणनीती तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी आखण्यात आली आहे. पारंपरिक प्रचाराच्या तुलनेत टीव्हीकेने स्वतःला वेगळे सिद्ध करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

अवघ्या २० वर्षीय युवकाने बदलले प्रचाराचे तंत्र 
ही किमया साधली आहे प्रवीण के. या २० वर्षीय तरुणाने. प्रवीण हा 'एआय आणि डेटा सायन्स'चा तृतीय वर्षाचा विद्यार्थी असून तो एक अर्धवेळ मार्केटिंग एजन्सी चालवतो.
त्याने विजय यांच्या भाषणाचा ५० सेकंदांचा एक 'एआय व्हिडिओ' तयार केला असून तो होलोग्रामच्या स्वरूपात प्रक्षेपित केला आहे. केवळ टीव्हीकेच नव्हे, तर अण्णा द्रमुकसारख्या मोठ्या पक्षांकडूनही त्याला आता अशा व्हिडिओसाठी विचारणा होत आहे.

Web Title : एआई, लेज़र का रोमांच! 'होलोग्राम विजय' ने खींचा ध्यान

Web Summary : तमिलनाडु की पार्टी ने 'थलपति' विजय के 3डी होलोग्राम का इस्तेमाल प्रचार के लिए किया। 20 वर्षीय युवक ने एआई वीडियो बनाया, जिससे नेता पूरे राज्य में मतदाताओं से वस्तुतः जुड़ सकते हैं, जिससे भारी भीड़ और युवा मतदाता आकर्षित हो रहे हैं।

Web Title : AI, Laser Thrills! 'Hologram Victory' Captures Attention

Web Summary : Tamil Nadu party uses 'Thalapathy' Vijay's 3D hologram for campaigning. A 20-year-old created the AI video, allowing the leader to virtually connect with voters across the state, attracting large crowds and youthful voters.