शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
4
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाची पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
5
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
6
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
7
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
8
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
9
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
10
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
11
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
12
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
13
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
14
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
15
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
16
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
17
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
18
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
19
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
20
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

'इंडिया'चे लवकरात लवकर भारत किंवा हिंदुस्तान करण्याबाबत निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 10:34 IST

याचिकाकर्त्या नमहा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर ही याचिका प्रातिनिधीक म्हणून घेतली जावी आणि योग्य मंत्रालयांनी त्यावर विचार करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २०२० मध्ये दिले होते.

लवकरच आपल्या देशाचे नाव बदलण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 'इंडिया'चे लवकरात लवकर भारत किंवा हिंदुस्तान करण्याबाबत निर्णय घ्या, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे लवकरात लवकर पालन करावे, यासाठी केंद्राच्या वकिलांनी संबंधित मंत्रालयांना योग्यरित्या माहिती द्यावी, असेही म्हटले आहे. 

याचिकाकर्त्या नमहा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर ही याचिका प्रातिनिधीक म्हणून घेतली जावी आणि योग्य मंत्रालयांनी त्यावर विचार करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २०२० मध्ये दिले होते. परंतू, या आदेशावर काहीच कार्यवाही झाली नाही म्हणून याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

वरिष्ठ वकील संजीव सागर यांच्यामार्फत ही याचिका दाखल झाली होती. यावर लवकर निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यावर सुनावणी घेत यावर निर्णय घेत याचिकाकर्त्याला काय निर्णय घेतला हे कळविण्याचे निर्देश दिले आहेत. 

काय म्हटले होते याचिकेत...

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही याचिकाकर्त्याच्या अर्जावर  कोणता निर्णय घेतला की नाही याबाबत केंद्राकडून कोणतीही अपडेट आलेली नाही. यामुळे पुन्हा याचिकेद्वारे या न्यायालयात जाण्याशिवाय याचिकाकर्त्याकडे पर्याय उरला नव्हता. 'इंडिया' हे इंग्रजी नाव देशाच्या संस्कृती आणि परंपरेचे प्रतिनिधित्व करत नाही आणि त्याचे नाव 'भारत' असे बदलल्याने नागरिकांना वसाहतवादी ओझ्यापासून मुक्तता मिळेल, असे याचिकेत म्हटले गेले होते. संविधानाच्या कलम १ मध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली होती. यात १९४८ चा हवालाही देण्यात आला आहे. १९४८ मध्ये तत्कालीन संविधानाच्या मसुद्याच्या कलम १ वर संविधान सभेत यावर चर्चा झाली होती, देशाचे नाव 'भारत' किंवा 'हिंदुस्तान' ठेवण्याच्या बाजूने जोरदार मागणी होत होती, असे म्हटले आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIndiaभारतSupreme Courtसर्वोच्च न्यायालय