शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

सारांश

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

विद्यार्थी वसतिगृहाची दुरवस्था

विद्यार्थी वसतिगृहाची दुरवस्था
नागपूर : नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहांची दयनिय अवस्था झाली आहे. या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लगतो. अनेक वसतिगृहांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छ बाथरुम व शौचालय उपलब्ध नाही. या सर्व वसतिगृहांमध्ये या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. सौरभ दुबे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले. यावेळी रूपेंद्र नागपुरे, समीर शेख, करण उमरेडकर, निखील कांबळे, शैलेंद्र तिवारी, अमोल हिरापुरे आदी उपस्थित होते.
एसएनडीएलची फ्रेंचाईसी
रद्द करण्याची मागणी
नागपूर : ग्राहकांचे हित लक्षात घेता महाल, गांधीबाग व सिव्हिल लाईन्स विभागातील एसएनडीएल कंपनीची फे्रंचाईसी रद्द करण्याची मागणी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस एन. बी. जारोंडे यांनी ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. एसएनडीएलच्या निकृष्ट सेवेमुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे ही फ्रेंचाईसी ताबडतोब रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
केबल टाकणाऱ्या कंपनीवर
कारवाईची मागणी
नागपूर : शहरात सध्या ४ जी सुविधेसाठी केबल टाकण्याचे काम सुरू आहे. न्यू अमरनगरातील गणेश अपार्टमेंटपुढे खड्डा खोदताना महापालिकेची गडरलाईन फुटली आहे. त्यामुळे गडरमधील पाणी विहिरीत झिरपत आहे. येथील नागरिक रोज या विहिरीतील पाणी वापरतात. मात्र, आता त्यांना टँकरने पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे केबल टाकणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
बीएसएनएल ट्रेनिंग संस्थेचा
वर्धापन दिन
नागपूर : बीएसएनएल ट्रेनिंग संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगा आणि मेडिटेशनवर मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेचे मुख्याध्यापक शुक्ला यांनी योग प्रशिक्षक सचिन माथुरकर व गुणशेखरन यांचा रोपटे देऊन सत्कार केला. सुख-शांती-समाधान संस्थेच्या सचिव शीला केळापुरे यांनी प्रास्ताविक केले. अष्टांग योगाची माहिती नमिता बांगरे यांनी दिली. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले. सुपेकर यांनी आभार मानले.