शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

स्टिंगने ‘आप’ला हादरा

By admin | Updated: March 13, 2015 23:14 IST

आम आदमी पार्टीतील (आप) कलह दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे. आता या पक्षातील अल्पसंख्याक सेलने बंडाळीचा झेंडा फडकवला आहे.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतील (आप) कलह दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे. आता या पक्षातील अल्पसंख्याक सेलने बंडाळीचा झेंडा फडकवला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीत मोदी लाट रोखण्यासाठी मुस्लिमांना आपशिवाय पर्याय नसल्याचे सांगून पक्षातील इच्छुक मुस्लिम उमेदवारांना तिकीट नाकारल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे.आपचे माजी नेते व अल्पसंख्यक सेलचे सरचिटणीस शाहिद आझाद यांनी शुक्रवारी जारी केलेल्या आॅडिओ स्टिंगने खळबळ उडाली आहे. ९० सेकंदांच्या या आॅडिओ टेपमध्ये केजरीवाल व पक्षाचे आणखी एक नेते इरफानुल्लाह खान यांच्यातील संभाषण आहे. या संभाषणात मुस्लिमबहुल भागात मुस्लिमांना तिकीट दिल्यास मतांचे विभाजन होईल आणि याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल. शिवाय मुस्लिमांकडे तसेही मोदी लाट रोखण्याकरिता आपशिवाय पर्याय नाही, असे केजरीवाल सांगत आहेत. हे वक्तव्य नेमके केव्हाचे आहे हे मात्र या टेपवरून स्पष्ट होत नाही. केजरीवाल समाजात मुखवटा घालून वावरतात. मुळात त्यांचा खरा चेहरा वेगळाच आहे, असाही आझाद यांचा आरोप आहे. यापूर्वीच्या दिल्ली निवडणुकीत आप सरकारला समर्थन देण्याच्या बदल्यात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव मनीष सिसोदिया व संजयसिंग यांनी दोनदा दिला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी आमदार आसिफ मोहंमद खान यांनी गुरुवारी केला होता.