राज्य शासनाचे अपील खारीज

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:01+5:302014-12-25T22:41:01+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर येथील हत्याप्रकरणाशी संबंधित राज्य शासनाचे अपील फेटाळून लावले आहे.

State appeals appeals | राज्य शासनाचे अपील खारीज

राज्य शासनाचे अपील खारीज

गपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर येथील हत्याप्रकरणाशी संबंधित राज्य शासनाचे अपील फेटाळून लावले आहे.
मृताचे नाव शालिनी होते. तिचा घटनेच्या पाच वर्षांपूर्वी आरोपी बाळू बंसीधर मेश्राम (५०) याच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना अपत्य नव्हते. ८ जानेवारी १९९८ रोजी शालिनीचा जळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी २९ एप्रिल २०१३ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला ४९८-अ (हुंड्यासाठी छळ), ३०४ (हुंडाबळी) व ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) या दोषारोपातून निर्दोष मुक्त केले होते. या निर्णयाला राज्य शासनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

Web Title: State appeals appeals