आवश्यक परवानगीनंतरच योजनांना प्रारंभ (भाग २)

By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:00+5:302014-12-19T22:57:00+5:30

उद्योगांना महाग दराने वीज

Start planning after necessary permission (Part 2) | आवश्यक परवानगीनंतरच योजनांना प्रारंभ (भाग २)

आवश्यक परवानगीनंतरच योजनांना प्रारंभ (भाग २)

्योगांना महाग दराने वीज
उद्योगांना देण्यात येणारी वीज इतर राज्याच्या तुलनेत महाग देण्यात येत असल्याची बाब मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. शेतकऱ्यांना कमी किमतीत वीज देण्यात येते. यामुळे होणारा तोटा उद्योगांकडून भरून काढल्या जातो. हा तोटा कमी करून उद्योगांना स्वस्त वीज देण्याबाबत विचार सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
-------
सुविधायुक्त कारागृहाची निर्मिती
नवीन नियमांनुसार कारागृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. आपल्या कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहे. यानंतर तयार करण्यात येणाऱ्या कारागृहात सुविधेसह न्यायालय दूर राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
----------
नागपुरात ऑटो हब करण्यासाठी प्रयत्न
नागपुरात ऑटो हब स्थापन करण्याबाबतचे खा. विजय दर्डा यांचे पत्र मिळाले आहे. या महत्त्वपूर्ण सूचनेवर सरकार काम करीत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Start planning after necessary permission (Part 2)