शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

चिंगारी भडकली! चीनच्या TikTok ला टक्कर देणार भारतीय अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:26 PM

या आधी मित्रो या अ‍ॅपने TikTok ला टक्कर देण्यास सुरुवात केली होती. मात्र, भारतीयाच्या देशभक्तीच्या भावनांशी या अ‍ॅपचे निर्माते खेळले होते.

नवी दिल्ली : चीनच्या TikTok वर देशात बंदी आणण्यासाठी मोहिम सुरु आहे. भारताच्या सुरक्षा यंत्रणांनीही चीनच्या 30 धोकादायक अ‍ॅपच्या यादीमध्ये हे अ‍ॅप टाकले आहे. या चिनी अ‍ॅपविरोधात आता भारताचे आणखी एक अ‍ॅप उतरले आहे. या अ‍ॅपचे नाव आहे चिंगारी. 

या आधी मित्रो या अ‍ॅपने TikTok ला टक्कर देण्यास सुरुवात केली होती. मात्र, भारतीयाच्या देशभक्तीच्या भावनांशी या अ‍ॅपचे निर्माते खेळले होते. मित्रो या अ‍ॅपचा सोर्सकोडच नाही तर हुबेहूब अ‍ॅप पाकिस्तानकडून घेण्यात आल्याचा खुलासा झाला होता. यानंतर या अ‍ॅपची रेटिंग घसरू लागली होती. गुगलने तर हे अ‍ॅप स्टोअरवरून काढून टाकले होते. 

आता चीनच्या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी भारताचे चिंगारी अ‍ॅप (Chingari) आले आहे. या अ‍ॅपला मोठा प्रतिसादही मिळू लागला आहे. हे अ‍ॅप विकसित कराणाऱ्यांनी सांगितले की, मेड इंन इंडिया अ‍ॅपची लोकप्रियता वाढू लागली आहे. केवळ 72 तासांत 5 लाखांवर डाऊनलोड मिळाले आहेत. टिकटॉकसारखेच चिंगारी अ‍ॅपही लहान व्हिडीओ शेअर करण्यासाठी आहे. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेचा फायदा मिळत आहे. चिंगारीचे डेव्हलपर बिस्वात्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी सांगितले की, चिंगारी अ‍ॅपचे सबस्क्रायबर वाढू लागले आहेत. आपल्या अ‍ॅपने टिकटॉकचे क्लोन अ‍ॅप मित्रों (Mitron) लाही मागे टाकले आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप पहिल्या नंबरवर ट्रेंड करत आहे. 

कसे आहे अ‍ॅप...चिंगारीवर व्हिडिओ अपलोड, डाऊनलोड केले जाऊ शकतात. याशिवाय यामध्ये मित्रांशी चॅटिंग, नवीन लोकांशी मैत्री, चॅटिंग, ब्राऊझिंगसह व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, ऑडिओ क्लिप्स, GIF स्टीकर आणि फोटोंसोबत क्रिएटिव्हीटी केली जाऊ शकते. 

Shocking! 'मित्रों' भारतीय नाही, 'शत्रू'कडून अवघ्या २६०० रुपयांना विकत घेतलेले

मित्रोची पोलखोलमित्रों हे अ‍ॅप कोणा भारतीय आयआयटीच्या विद्यार्थ्याने विकसित केलेले नाहीय. तर या अ‍ॅपचा सोर्स कोड म्हणजेच डेव्हलपरच्या कोडसह, त्या अॅपमधील फिचर, युजर इंटरफेस हा जसाचे तसा एका पाकिस्तानी कंपनीकडून विकत घेण्यात आला आहे. पाकिस्तानी सॉफ्टवेअर निर्माता कंपनी Qboxusचे संस्थापक आणि मुख्य संचालक इरफान शेख यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

India China FaceOff: भारतद्वेष्ट्या चिनी जनरलनेच दिला हल्ल्याचा आदेश; अमेरिकी गुप्तहेरांचा दावा

'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या...

India China FaceOff: हाय रे दैवा! 'मेड इन चायना' बुलेटप्रूफ जॅकेट घालूनच चीनसोबत लढणार?

India China Face Off: चीनी सैनिकांची खैर नाही! भारताचे सर्वात खतरनाक पहाडी योद्धे तैनात

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकIndiaभारतchinaचीनgoogleगुगल