शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भारत-सिंगापूर व्यापारी संबंधांत काही राज्यांचीही असेल महत्त्वाची भागीदारी - पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 05:06 IST

वार्षिक ४८ लाख कंटेनर हाताळणी क्षमतेच्या भारत-मुंबई कंटेनर टर्मिनलचा शुभारंभ

उरण - भारत-सिंगापूर व्यापारी संबंधांमध्ये देशातील काही राज्येही महत्त्वपूर्ण भागीदार असतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्यक्त केला. ‘पीपीपी’च्या माध्यमातून जेएनपीएने ११,४०० कोटी खर्च करून बंदरातील सर्वाधिक लांबीच्या आणि वार्षिक ४८ लाख कंटेनर हाताळणीची क्षमता असलेल्या भारत-मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी-सिंगापूर पोर्ट) बंदराचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.   

गेल्यावर्षी सिंगापूर दौऱ्यात दोन्ही देशांच्या संबंधांना व्यापक सामरिक भागीदारीचा दर्जा दिला होता. या वर्षभरात परस्पर संवाद आणि सहकार्य गतिशील आणि दृढ झाले आहे.  आमचे सहकार्य केवळ पारंपरिक क्षेत्रापुरते मर्यादित राहणार नाही. बदलत्या काळानुसार प्रगत उत्पादन, हरित नौवहन, कौशल्यवर्धन, नागरी आण्विक आणि नागरी जलव्यवस्थापन ही क्षेत्रेही आमच्या सहकार्याचे केंद्रबिंदू ठरतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. 

समुद्री क्षेत्रात महाराष्ट्र महासत्ता बनेलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पुढील शंभर वर्षांसाठी समुद्री क्षेत्रातील महासत्ता बनेल, असा विश्वास व्यक्त केला. या ऐतिहासिक घटनेमुळे भारतातील सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये नवीन अध्याय सुरू झाला असून, हे टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे, असे त्यांनी सांगितले.

पाठिंब्याबद्दल  मानले आभारपहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांप्रति संवेदना, दहशतवाद विरुद्धच्या आमच्या लढाईला पाठिंबा दिल्याबद्दल  पंतप्रधान वॉन्ग आणि सिंगापूर सरकारचे आभारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

टॅग्स :JapanजपानIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस