शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘काही लोक मुख्यमंत्री म्हणून मला पाहू इच्छितात’, सिद्धारामैय्या-शिवकुमार वादात तिसऱ्या नेत्याची एंट्री   

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 15:12 IST

Karnataka Political Update: कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. तसेच मुख्यमंत्री सिद्धारामैय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदावरून आमने सामने आले आहेत. त्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता कर्नाटकमधील काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्याने या वादात उडी घेतली आहे.

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. तसेच मुख्यमंत्री सिद्धारामैय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदावरून आमने सामने आले आहेत. त्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता कर्नाटकमधील काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्याने या वादात उडी घेतली आहे. काही लोक मुख्यमंत्री म्हणून मला पाहू इच्छित आहेत, असं सांगत राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी खळबळ उडवून दिली आहे.

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याबाबत बोलताना राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले की, पक्षामधील विविध नेत्यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत आपापल्या आकांक्षा आहेत. कुणाला डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. तर कुणी सिद्धारामैय्या यांना मुख्यमंत्री कायम राहिलेले पाहू इच्छित आहे. तर काही जण मला मुख्यमंत्रिपदी बसलेलं पाहू इच्छितात. तर कुणी आणखी कुणाला या पदावर आलेलं पाहू इच्छितोय. या इच्छा आकांक्षांना थांबवता येऊ शकत नाही. आता निर्णय हायकमांडच्या हातात आहे. तसेच पक्षाचे हायकमांड यावर लक्ष देऊन यावर तोडगा काढतील.

मिळालेल्या माहितीनुसार सिद्धारामैय्या यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर डी.के. शिवकुमार हे दिल्लीत जाणार आहेत. तसेच तिथे ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची भेट घेतील. तर सिद्धारामैय्या यांनी आपली भूमिका स्पष्ट असल्याचं मत मांडलं आहे.  ‘हायकमांड जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणूनच मी डी. के. शिवकुमार यांना सकाळी नाश्त्यासाठी बोलावलं आहे. तसेच शिवकुमार यांनीही हायकमांडचा निर्णय मान्य असेल, असं सांगितलेलं आहे, असे सिद्धारामैय्या म्हणाले होते.    

English
हिंदी सारांश
Web Title : Karnataka CM race intensifies: G. Parameshwara enters the fray.

Web Summary : Karnataka's CM post sees new twist as G. Parameshwara expresses his ambition amid Siddaramaiah-Shivakumar power struggle. The final decision rests with the high command, who will find a solution. Both leaders have stated they will accept the high command's decision.
टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेस