बलात्काराविषयी समाजवादी नेत्याने पुन्हा तारे तोडले

By Admin | Updated: June 17, 2014 15:11 IST2014-06-17T15:11:22+5:302014-06-17T15:11:46+5:30

घरातील पाळीव प्राण्यांनाही कोणी घरातून जबरदस्ती बाहेर काढू शकत नाही असे संतप्त विधान करत समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी अप्रत्यक्षपणे बलात्कारासाठी महिलांनाच जबाबदार ठरवले आहे.

The socialist leader again broke the stars about the rapist | बलात्काराविषयी समाजवादी नेत्याने पुन्हा तारे तोडले

बलात्काराविषयी समाजवादी नेत्याने पुन्हा तारे तोडले

ऑनलाइन टीम

लखनौ, दि. १७- घरातील पाळीव प्राण्यांनाही कोणी घरातून जबरदस्ती बाहेर काढू शकत नाही असे संतप्त विधान करत समाजवादी पक्षाचे महासचिव आणि खासदार नरेश अग्रवाल यांनी अप्रत्यक्षपणे बलात्कारासाठी महिलांनाच जबाबदार ठरवले आहे. या विधानानंतर अग्रवाल यांनी आवरते घेत अधिक बोलण्यास नकार दिला आहे. 
उत्तरप्रदेशमधील कायदा व सुव्यवस्था दिवसेगणिक ढासळत असून बदायूत सामूहिक बलात्काराच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमुळे उत्तरप्रदेश सरकारची नाचक्की होत असतानाच सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या नेत्यांनीही बलात्काराच्या घटनांवर मुक्ताफळे उधळणे सुरुच ठेवली आहेत. पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांना एका वृत्तवाहिनीने बदायूतील अपहरण व बलात्काराच्या घटनेविषयी विचारणा केली.  यावर नरेश अग्रवाल म्हणाले, मी महिला अत्याचारांवर जास्त बोलणार नाही. पण आज घरातील प्राण्यांनाही खेचून बाहेर नेता येत नाही. यानंतर मात्र अग्रवाल यांनी चुप्पी साधली. 
जर एखाद्या मुलीने बलात्काराचे आरोप केले असतील तर त्याचा तपास होईल. यात तथ्य आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करु. पण जर खोटी तक्रार केली असेल तर काहीच कारवाई करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. अग्रवाल यांच्या या बेजबाबदार वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. 

Web Title: The socialist leader again broke the stars about the rapist