शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

शाकाहारी व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी, धुम्रपान करणाऱ्यांनाही सर्वेक्षणातून सुखद धक्का

By जयदीप दाभोळकर | Published: January 18, 2021 11:05 AM

१० हजारांपेक्षा अधिक व्यक्तींचे नमूने घेऊन करण्यात आलं सर्वेक्षण

ठळक मुद्देशाकाहारी, ओ आणि ए रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना धोका कमीयापूर्वी न्यूयॉर्क, इटली. फ्रान्स आणि चीनमध्येही करण्यात आलं होतं सर्वेक्षण

कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. संपूर्ण भारतात करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणानुसार धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती आणि शाहाकारी व्यक्तींमध्ये कोरोनाचा धोका कमी असल्याची माहिती समोर आली आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्चनं ४० ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात  आला आहे. तर दुसरीकडे ज्यांच्या रक्तगट 'ओ' किंवा 'ए' आणि जे खासगी वाहन, शाकाहारी पदार्थांचं सेवन करतात  त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका कमी असू शकतो. तर ज्यांचा रक्तगट 'बी' आणि 'एबी' आहे त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असू शकतो असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्चनं व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडिज आहेत किंवा नाहीत याचा अभ्यास करण्यासाठी आपल्या प्रयोगशाळेतील आणि संस्थेमध्ये काम करणार्या १० हजार ४२७ वयस्कर व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नमूने घेतले. ज्या व्यक्तींना स्वइच्छेनं यात सहभागी व्हायचं आहे अशाच व्यक्तींचा यात समावेश करण्यात आला. १० हजार ४२७ व्यक्तींचे नमूने घेण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ०५८ म्हणजेच १०.१४ टक्के लोकांमध्ये SARS-CoV-2 चे अँटिबॉडिड असल्याचं कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च आणि इंस्टीट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव बायोलॉजी (IGIB), दिल्ली यांच्या अभ्यासातून समोर आलं आहे. "गोळा करण्यात आलेल्या नमून्यांपैकी ३४६ सिरो पॉझिटिव्ह व्यक्तींच्या तीन महिन्यांनंतर केलेल्या तपासणीनंतर त्यांच्यात SARS-CoV-2 च्या प्रती असलेल्या अँटिबॉटिजचा प्रमाण स्थिर पासून अधिक इतकं होतं. परंतु विषाणूचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक असलेली प्लाझ्मा अॅक्टिव्हिटीत मात्र घसरण दिसून आली," अशी माहिकी आयजीआयबीमधील ज्येष्ठ वैज्ञानिक आणि या अभ्यासाचे सह-लेखक शंतनू सेनगुप्ता यांनी सांगितलं. "३५ व्यक्तींचे सहा महिन्यांनंतर पुन्हा नमूने तपासणीसाठी घेण्यात आले. परंतु अँटिबॉडीचा स्तर हा तीन महिन्यांच्या तुलनेत कमी झालेला दिसला. तर विषाणूचा परिणाम कमी करणार्या अँटिबॉडीचं प्रमाण स्थिर असल्याचं दिसून आलं," असंही ते म्हणाले. 

धुम्रपान करणाऱ्यांना संक्रमणाचा धोका कमी"धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये सिरो पॉझिटिव्ह असण्याची शक्यता कमी आहे असा आमचा निष्कर्ष आहे. कोरोनामुळे श्वसनासंबंधी आजार निर्माण होत असला तरी धुम्रपानामुळे यापासून बचाव होऊ शकतो," असंही या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. या अभ्यासात फ्रान्समधील दोन, इटली, न्ययॉर्क, आणि चीनमधील सर्वेक्षणाच्या अहवालाचा हवाला देण्यात आला आहे. त्यामध्येही धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये संक्रमणाचा दर कमी असल्याचं दिसून आलं होतं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSmokingधूम्रपानvegetableभाज्याdelhiदिल्लीIndiaभारत