शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बसस्थानकाला सरकते प्रवेशद्वार

By admin | Updated: April 22, 2016 23:21 IST

जळगाव- अनधिकृत वाहनांचा होणारा वारंवार प्रवेश व इतर समस्या लक्षात घेता नवीन बसस्थानकाच्या बस आत व बाहेर जाणार्‍या दोन्ही दरवाजांना सरकते प्रवेशद्वार बसविण्याची कार्यवाही सुरू आहे.

जळगाव- अनधिकृत वाहनांचा होणारा वारंवार प्रवेश व इतर समस्या लक्षात घेता नवीन बसस्थानकाच्या बस आत व बाहेर जाणार्‍या दोन्ही दरवाजांना सरकते प्रवेशद्वार बसविण्याची कार्यवाही सुरू आहे.
हे सरकते प्रवेशद्वार उभारण्याचे काम सुरू झाले असून, आठ दिवसात द्वार उभारले जातील, अशी माहिती विभाग नियंत्रक आर.वाय.साळवे यांनी दिली.

अनधिकृत प्रवेश टाळणार
अनेकदा बसस्थानकात मोर्चे आणून प्रवाशांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळेस बसस्थानकात संशयित व्यक्ती फिरते, पण त्यांना बसस्थानकात शोधण्याची मोहीम सुरू होण्यापूर्वीच प्रवेशद्वार नसल्याने अशा व्यक्ती पसार होतात. तसेच मध्यरात्री अनेक अनधिकृत वाहने बसस्थानकामध्ये असतात. अशी वाहने येऊ नये व इतर खबरदारीचे उपाय म्हणून सरकते प्रवेशद्वार बसविले जात आहेत. असेच द्वार बसस्थानकामध्ये डिझेलपंप असलेल्या भागातही लावले जाणार आहे.

आठ दिवसात काम
या सरकत्या प्रवेशद्वारांचे काम आठ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना कार्यालयाने दिल्या आहेत. रात्रीच्या वेळेस हे काम गतीने सुरू असते.

अडीच लाख निधी
या कामासाठी जळगाव एसटी विभागाने अडीच लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रवेशद्वारांसाठी स्वतंत्र निविदा काढून काम देण्यात आले.

तीन रक्षक नियुक्त
बसस्थानकात रात्रीच्या वेळेस कुणी अनधिकृत प्रवेश करू नये यासाठी तीन रक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. दोन रक्षक हे दोन्ही बाजूच्या प्रवेशद्वारांनजीक असतात. तर तिसरा रक्षक हा बसस्थानकामध्ये असतो.

सहा सीसीटीव्हींची मागणी
बसस्थानकात नव्याने बसविले जाणारे प्रवेशद्वार आणि निवारामध्ये सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. जिल्हा नियोजन समितीकडे तशी मागणी केली आहे. प्रवेशद्वारांवर चार आणि निवार्‍यामध्ये दोन सीसीटीव्ही बसविले जातील, अशी माहिती विभाग नियंत्रक साळवे यांनी दिली.