शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

स्काईपचा वापर करुन रचलेला दहशतवादी हल्ल्याचा कट

By admin | Updated: August 17, 2014 15:13 IST

कोलकाता येथे तुरुंगात असलेल्या दोघा संशयीत दहशतवाद्यांनी स्काईप या सॉफ्टवेअरचा वापर करत पाकिस्तानमधील सूत्रधारांसोबत मिळून भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १७ -कोलकाता येथे तुरुंगात असलेल्या दोघा संशयीत दहशतवाद्यांनी स्काईप या सॉफ्टवेअरचा वापर करुन पाकिस्तानमधील सूत्रधारांसोबत मिळून भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. धक्कादायक बाब म्हणजे याबाबत तुरुंग प्रशासन पूर्णतः अनभिज्ञ होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने तुरुंग प्रशासनाला ही गंभीर बाब लक्षात आणून दिली आहे. मात्र या वृत्तामुळे तुरुंगातील अनागोंदी कारभाराचा प्रश्न पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. 
 
लष्कर ए तोयबाचे संशयित दहशतवादी अर्शद खान आणि शौकत हे सध्या कोलकाता येथील अलीपूर तुरुंगात आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला तपासादरम्यान हे दोघे दहशतवादी तुरुंगात स्मार्टफोन वापरत असल्याचे उघड झाले आहे. या दोघांच्या स्मार्टफोनवर स्काईप हे व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल आहेत. स्काईपच्या आधारे हे दोघे दहशतवादी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांशी संपर्क साधत होते. हे दोघेही तुरुंगात बसून दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होते असेही समोर आले आहे. मोबाईलवरुन थेट फोन केल्यास दोघेही लगेच पकडले गेले असते. मात्र स्काईपद्वारे व्हिडीओ कॉलिंग केल्यास ते ट्रेस करणे कठीण असते. स्काईपचे आयपी कोड डिकोड करणे कठीण असते. याचा फायदा घेत त्यांनी स्काईपचा वापर केला. मात्र त्यांची ही चलाखी दिल्ली पोलिसांच्या लक्षात आली आणि त्यांनी जेल प्रशासनाला या घटनेची माहिती दिली. 
दिल्ली पोलिसांनी तुरुंगप्रशासनाला पत्र पाठवून या दोघा दहशतवाद्यांवर विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. या दोघांच्या सुरक्षेव्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. कोलकाताप्रमाणेच दिल्लीतील तिहार तुरुंगातील दहशतवादीही स्मार्टफोन वापरत असल्याचा पोलिसांना संशय आहे.