मृत्युप्रकरणी सहा वर्षांची सक्तमजुरी
By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:30+5:302015-08-31T21:30:30+5:30
पुणे : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकाच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्याला ६ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. दत्तु नामदेव शिंदे (वय ३८, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधिश आर. आर.एच.मोहम्मद यांनी हा आदेश दिला आहे.

मृत्युप्रकरणी सहा वर्षांची सक्तमजुरी
प णे : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकाच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्याला ६ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. दत्तु नामदेव शिंदे (वय ३८, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधिश आर. आर.एच.मोहम्मद यांनी हा आदेश दिला आहे. राजेंद्र भरतु चरण (वय ४२, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची पत्नी लक्ष्मी चरण (वय ३८) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. दि. १ ऑक्टोबर २००९ रोजी पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयाजवळील स्मशानभूमीजवळ हा प्रकार घडला होता. शिंदे व चरण कुटूंबीय एकाच कॉलनीत शेजारी राहतात. त्यांच्यात किरकोळ कारणांवरून नेहमीच वाद होत होते. दत्तुची आरोपीची पत्नी छाया शिंदे या नळावर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी लक्ष्मी चरण यांनी भिंतीवर वाळत घातलेल्या साडीतून नळावरील बादलीत पाण्याचे काही थेंब पडले. यावरून दोघींमध्येवाद सुरू झाला. यावेळी फिर्यादी व राजेंद्र शिंदे त्यांना समजावत होते. मात्र, रागावलेल्या दत्तुने राजेंद्र यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांच्या तोंडावर जोरजोरात लाढा मारल्या. यातच ते बेशुध्द पडले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच दि. ४ ऑक्टोबर २००९ रोजी त्यांचा मृत्यु झाला. मारहाण झाल्यानंतर आरोपीवर भादवी ३०७ (खुनाचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण राजेंद्र यांचा मृत्यु झाल्यानंतर कलम ३०२ (खुन) लावण्यात आले. मात्र, न्यायालयाने ३०४ (२) हे सदोष मनुष्यवधाचे कलम लावून दत्तु दोषी ठरवून ६ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. संदीप वाघ यांनी १२ साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादीची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा महत्वाचा ठरला.-----------------------