शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

सिंघम म्हणजे पोलीस नव्हे - पोलीस महासंचालक

By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST

औरंगाबाद : सिंघम सिनेमामध्ये दाखविण्यात आलेला पोलीस अधिकार्‍यासारखे पोलिसांचे कामकाज चालत नाही. सिंघम म्हणजे पोलीस नव्हे तर पोलिसांना कुटुंबापासून दूर राहून १८-१८ तास काम करावे लागते. पोलिसांच्या कामकाजाचे हे खरे स्वरुप पाहायचे असेल तर नागरिकांनी निदान एक दिवस तरी पोलिस लाईनमध्ये जाऊन राहिले पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी केले.

औरंगाबाद : सिंघम सिनेमामध्ये दाखविण्यात आलेला पोलीस अधिकार्‍यासारखे पोलिसांचे कामकाज चालत नाही. सिंघम म्हणजे पोलीस नव्हे तर पोलिसांना कुटुंबापासून दूर राहून १८-१८ तास काम करावे लागते. पोलिसांच्या कामकाजाचे हे खरे स्वरुप पाहायचे असेल तर नागरिकांनी निदान एक दिवस तरी पोलिस लाईनमध्ये जाऊन राहिले पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी केले.
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांकरिता युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप ही वक्तृत्व स्पर्धा एमजीएम कॅम्पसमधील रुख्मिणी हॉल येथे गुरुवारी घेण्यात आली. स्पर्धेचे उदघाटन पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अप्पर पोलीस महासंचालक (सीआयडी क्राईम) संजीव कुमार, अप्पर पोलीस महासंचालक (नियोजन) राजेंद्र सिंग, सीआयआयएच्या मराठवाडा विभागाचे चेअरमन श्रीराम नारायण, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी दयाल म्हणाले की, आपल्या देशासमोर आगळेवेगळे प्रश्न आणि आव्हाने आहेत. हे प्रश्न सोडवीत समाजाला पुढे नेण्याकरिता पोलीस विभाग सतत प्रयत्नशील असतो. देशात तरुणांची संख्या अधिक असून १२ वर्षांत ही संख्या वाढतच राहणार आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. ही बाब लक्षात घेऊन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. ग्रामीण आणि शहरी भागातील दहा शाळांतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

तरुणांना पोलीस दलाचे काम करण्याची संधी
कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यूथ पार्लमेंट चॅम्पियनशिप ही वक्तृत्व स्पर्धेची माहिती दिली. तसेच तरुणांकरिता आयोजित युथ इंटर्नशिपचे उदघाटन पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत होत असल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी पोलीस आणि जनता यांच्यातील दुरावा कमी व्हावा, तसेच पोलीस विभागाचे कामकाज कसे चालते हे पाहण्याची आणि त्यात सहभागी होण्याची संधी तरुणांना देण्यात आली आहे. कार्यक्रमाचे संचालन परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी केले. यावेळी सीआयआयएचे नारायण यांनी मनोगत व्यक्त केले.