शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धू यांच्याकडे थकले ८ लाख रुपयांचे वीज बिल, थकीत वीज बिलाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 13:15 IST

सूत्रांनी सांगितले की, पंजाबात मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि सिद्धू यांच्यात सध्या सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यातून सिद्धू यांनी राज्यातील वीजसमस्येबद्दल ट्वीट केले होते. त्याला शह देण्यासाठी अमरिंदर यांच्या कॅम्पने सिद्धू यांच्या वीज बिल थकबाकीचा मुद्दा समोर आणला आहे. 

अमृतसर : पंजाबचे माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी मागील आठ महिन्यापासून वीज बिलच भरले नसल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्याकडे ८.६७ लाख रुपयांची थकबाकी आहे. राज्यातील वीजसमस्येबद्दल आवाज उठविणारे ट्विट काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी केले होते. त्यानंतर लगेचच त्यांच्या थकीत वीज बिलाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. (Sidhu has Rs 8 lakh electricity bill, photos of overdue electricity bill go viral on social media) पंजाब राज्य वीज महामंडळाच्या वेबसाईटनुसार, सिद्धू यांच्या अमृतसरमधील घराचे ८,६७,५४० रुपयांचे वीज बिल थकले आहे. या महिन्यातील वीज बिल भरण्याची अंतिम तारीख २ जुलै होती. मागील आठ महिन्यापासून सिद्धू यांनी बिल भरले नसल्याचे दिसून आले आहे.सिद्धू हे प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत, तर वीज महामंडळाने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. सूत्रांनी सांगितले की, पंजाबात मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि सिद्धू यांच्यात सध्या सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यातून सिद्धू यांनी राज्यातील वीजसमस्येबद्दल ट्वीट केले होते. त्याला शह देण्यासाठी अमरिंदर यांच्या कॅम्पने सिद्धू यांच्या वीज बिल थकबाकीचा मुद्दा समोर आणला आहे. 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसPunjabपंजाब