शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
3
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
4
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
5
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
6
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
7
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
8
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
9
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
10
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
11
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
12
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
13
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
14
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
15
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
16
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
17
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
18
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
19
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
20
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नोटाबंदीदरम्यान किती मृत्यू झाले? पीएमओकडे आकडेवारीच नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 10:20 IST

नोटाबंदीदरम्यान देशात किती मृत्यू झाले याबाबत पीएमओकडे माहितीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आले आहे. 

ठळक मुद्देनोटाबंदीदरम्यान देशात किती मृत्यू झाले याबाबत पीएमओकडे माहितीच नसल्याची धक्कादायक बाब समोरनोटाबंदीदरम्यान देशात किती मृत्यू झाले याची माहिती पीएमओकडे नाही, असे पीएमओच्या मुख्य माहिती अधिकाऱ्यांनी केंद्रीय सूचना आयुक्तांसमोर सांगितलेनोटाबंदीदरम्यान देशात किती मृत्यू झाले याबाबत माहिती घेण्यासाठी नीरज शर्मा यांनी पीएमओ कडे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज केला होता

नवी दिल्ली -  काळापैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आता दोन वर्षे उलटून गेली आहेत. नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला तेव्हा सर्वसामान्यांना अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले होते. जुन्या नोटा जमा करून रोख रक्कम मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागले होते. त्यादरम्यान, काही जणांचा रांगेत मृत्यू झाल्याचेही समोर आले होते. मात्र नोटाबंदीदरम्यान देशात किती मृत्यू झाले याबाबत पीएमओकडे माहितीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

नोटाबंदीच्या काळात देशात किती मृत्यू झाले, याबाबतची माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत मागवण्यात आली होती. त्याला उत्तर देताना नोटाबंदीदरम्यान देशात किती मृत्यू झाले याची माहिती पीएमओकडे नाही, असे पीएमओच्या मुख्य माहिती अधिकाऱ्यांनी केंद्रीय सूचना आयुक्तांसमोर सांगितले. नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर काही व्यक्तींचा रांगेमध्ये तर काही जणांचा कामावर असताना मृत्यू झाल्याच्या बातम्या त्यावेळी आल्या होत्या.
 नोटाबंदीदरम्यान देशात किती मृत्यू झाले याबाबत माहिती घेण्यासाठी नीरज शर्मा यांनी पीएमओ कडे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज केला होता. तसेच त्यांनी मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती मागवली होती. मात्र पीएमओकडून  निर्धारित 30 दिवसांमध्ये माहिती न मिळाल्याने त्यांनी केंद्रीय माहिती आयुक्तांकडे धाव घेत पीएमओमधील माहिती अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. 

अखेरीस केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांसमोर झालेल्या सुनावणी वेळी पीएमओमधील माहिती अधिकाऱ्यांनी माफी मागितली. तसेच शर्मा यांनी जी माहिती मागवली आहे ती माहितीचा अधिकार कायद्यातील कमल 2 (एफ) अंतर्गत माहितीच्या कक्षेत येत नाही, असे सांगितले.  

दरम्यान, तत्कालीन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना 18 डिसेंबर 2018 रोजी  मिळालेल्या माहितीप्रमाणे नोटाबंदी दरम्यान स्टेट बँकेच्या तीन अधिकाऱ्यांचा एका ग्राहकाचा मृत्यू झाल्याचे मान्य केले होते.  

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणNote BanनोटाबंदीCentral Governmentकेंद्र सरकारRight to Information actमाहिती अधिकार