शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद
2
पुश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
3
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
4
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
5
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
6
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
7
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
8
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
9
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
10
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
11
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
12
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
13
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
14
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
15
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
16
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
17
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
18
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
19
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
20
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
Daily Top 2Weekly Top 5

"राम मंदिर आंदोलन 500 वर्षं चाललं..."; कृष्ण जन्मभूमी प्रकरणावरील HC च्या निर्णयावर प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 20:09 IST

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "मी आठवण करून देऊ इच्छिते की, रामजन्मभूमी आंदोलन हे 500 वर्षे चालले, सर्वोच्च न्यायालयात लढाई लढली गेली. भारतीय जनता पार्टीने त्याचे श्रेय घेण्याचे काम केले. त्यावर राजकारण केले.

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी तथा शाही ईदगाह मशीद प्रकरण सुनावणी योग्य असल्याचे आज (गुरुवार) आलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यानंतर, आता या मुद्द्यावर राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. यातच, शिव सेना (उद्धव ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, उच्च न्यायालयाने कृष्ण जन्मभूमीशी संबंधित प्रकरण स्वीकारले आहे. आता एक कायदेशी प्रक्रिया सुरू केली जाईल आणि दोन्ही पक्षांची बाजू एकली जाईल.

पीटीआय सोबत बोलताना राज्यसभा कासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "मी आठवण करून देऊ इच्छिते की, रामजन्मभूमी आंदोलन हे 500 वर्षे चालले, सर्वोच्च न्यायालयात लढाई लढली गेली. भारतीय जनता पार्टीने त्याचे श्रेय घेण्याचे काम केले. त्यावर राजकारण केले. शंकराचार्यांना बोलावले नाही. स्वतः जाऊन मंदिराचे उद्घाटन केले. तर, प्रभू श्रीरामांनीही त्यांचा लोकसभेत पराभव करून, 'माझ्या नावावर राजकारण होऊ नये', असा संदेश दिला. तो सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमाने झालेला आम्हा लाखो करोडो हिंदूंच्या भावनांचा विजय होता." 

चतुर्वेदी पुढे म्हणाल्या, "जर यांनी कृष्ण जन्मभूमीच्या बाबतीतही हेच काम केले तर..., मी सांगते, भगवान श्रीकृष्णांनी 17 वेळा मथुरा सोडली असेल, मात्र अठराव्यांदा जेव्हा आले, त्यांनी कंसाचा वध केला होता. भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू श्रीराम यांच्या नावाने जे राजकारण करतील, त्यांना धडा तेच शिकवतील."

कृष्ण जन्मभूमीवर सुनावणी सुरूच राहणार - 
मथुरेतील भगवान श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह प्रकरणी आज अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.  याप्रकरणी हिंदू पक्षाने 18 याचिका दाखल केल्या होत्या. यात शाही ईदगाह मशिदीची जागा आपली (हिंदू) असल्याचे म्हणण्यात आले होते. एवढेच नाही तर, आपल्याला तेथे पूजा करण्याचा अधिकारही मिळावा, अशी मागणीही हिंदू पक्षाकडून करण्यात आली होती. 

यानंतर, मुस्लीम पक्षानेही प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट, वक्फ अ‍ॅक्ट, लिमिटेशन अ‍ॅक्ट आणि स्पेसिफिक पझेशन रिलीफ अ‍ॅक्टचा हवाला देत हिंदू पक्षाच्या याचिका फेटाळण्याची विनंती केली होती. मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळून लावली आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, आता अलाहाबाद उच्च न्यायालयात हिंदू पक्षाने दाखल केलेल्या 18 याचिकांवर सुनावणी सुरू राहणार आहे. पुढची सुनावणी 12 ऑगस्टला होणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण