शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

शपथविधीला येणार शरीफ

By admin | Updated: May 25, 2014 05:19 IST

नव्या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वीच शेजारी व क्षेत्रिय देशांकडे मैत्री व सद््भावनेचा हात पुढे करण्याचे यशस्वी सकारात्मक पाऊल मानले जात आहे

नवी दिल्ली : नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होणार्‍या शपथविधी समारंभास पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांच्यासह आता दक्षिण आशियाई सहकार्य परिषदेतील (सार्क) आठही देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत. यास नव्या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वीच शेजारी व क्षेत्रिय देशांकडे मैत्री व सद््भावनेचा हात पुढे करण्याचे यशस्वी सकारात्मक पाऊल मानले जात आहे. पाकिस्तानी लष्कर आणि तेथील भारतद्वेषी कट्टरपंथी यांचा दबाव झुगारून शरीफ दिल्लीला येणार की नाही याविषयीची अनिश्चितता संपुष्टात आली. स्वत: मोदी यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार शरीफ दिल्लीला जाणार असल्याची पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाने शनिवारी पुष्टी केली. पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सोमवारी सायंकाळी शपथविधीला उपस्थित राहिल्यानंतर मंगळवारी २७ मे रोजी नवाज शरीफ व पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सरताज अझीझ हेही शरीफ यांच्यासोबत येणार आहेत. कोणाही भारतीय पंतप्रधानाच्या शपथविधीला पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण दिले जाण्याची व त्यांनीही ते स्वीकारून उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ असेल. लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर नवाज शरीफ यांनी मोदी यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले होते व पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पाकिस्तानला भेट देण्याचे निमंत्रणही दिले होते. सूत्रांनुसार मोदी व शरीफ यांची भेट औपचारिक असेल व त्यात वादग्रस्त द्विपक्षीय मुद्द्यांवर फारसा खल होण्याची शक्यता नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)