शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या टीममधून शहांनी वरुण गांधींना वगळले

By admin | Updated: August 17, 2014 02:45 IST

भाजपाचे नवे अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी पक्ष पदाधिका:यांच्या नव्या टीमची घोषणा केली.

भाजपा पदाधिका:यांची घोषणा : विजया रहाटकर, पूनम महाजन, सहस्रबुद्धे, श्याम जाजू यांना संधी
नवी दिल्ली : भाजपाचे नवे अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी पक्ष पदाधिका:यांच्या नव्या टीमची घोषणा केली. रा.स्व. संघाचे राम माधव यांना सरचिटणीस तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांना उपाध्यक्ष म्हणून स्थान मिळाले आहे. राजनाथसिंग यांच्या काळात सरचिटणीस राहिलेल्या वरुण गांधी यांना मात्र वगळण्यात आले. औरंगाबादच्या माजी महापौर विजया रहाटकर यांना महिला मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर विनय सहस्रबुद्धे, पूनम महाजन, श्याम जाजू यांनाही विविध पदांवर संधी देण्यात आली आहे. 
शहा यांनी अध्यक्षपदी नियुक्तीच्या एक आठवडय़ानंतर नव्या  पदाधिका:यांची घोषणा केली. 8 सरचिटणीस, 11 उपाध्यक्ष, 14 सचिव आणि 1क् प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली, त्यापैकी 5 प्रवक्ते नवे आहेत. मेनका गांधी मोदी सरकारमध्ये महिला आणि बाल कल्याण मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे पुत्र सुल्तानपूरचे खासदार वरुण गांधी यांना स्थान देण्यात आले नसल्याचे सूत्रंनी सांगितले. जगतप्रकाश नड्डा, राजीव प्रताप रुडी, मुरलीधर राव, राम माधव, सरोज पांडेय, भूपेंद्र यादव, रामशंकर कठेरिया आणि रामनाथ हे 8 नवे सरचिटणीस आहेत. बंडारू दत्तात्रेय, बी.एस. येदियुरप्पा, सत्यपाल मलिक, मुख्तार अब्बास नकवी, पुरुषोत्तम रूपाला, प्रभात झा, रघुवर दास, किरण माहेश्वरी, विनय सहस्रबुद्धे, रेणुदेवी, दिनेश शर्मा यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 
श्याम जाजू, अनिल जैन, एच. राजा, रोमेन डेका, सुधा यादव, पूनम महाजन, रामविचार नेताम, अरुणसिंग, सिद्धार्थनाथ सिंग, आर.पी. सिंग, श्रीकांत शर्मा, ज्योती धुव्रे, तरुण चुघ, रजनीश कुमार हे सचिव तर अरुण जैन कार्यालय सचिव आहेत. शहनवाज हुसेन, सुधांशू त्रिवेदी, मीनाक्षी लेखी, एम.जे. अकबर, विजय सोनकर शास्त्री, ललिताकुमार मंगलम्, नलीन कोहली, डॉ. संविद पात्र, अनिल वलूनी आणि जी.व्ही.एल. नरसिंहा राव हे प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळतील. राम माधव, सरोज पांडे, भूपेंद्र यादव आणि कठेरिया हे चौघे नवे सरचिटणीस आहेत. राम माधव रा.स्व. संघातून आले आहेत. सरोज यापूर्वी महिला आघाडीच्या अध्यक्ष होत्या.
 
शहांची यंग टीम..
शहा यांच्या नव्या चमूत मागासवर्गीय पाच जण असून, सहा महिला तसेच अनुसूचित जाती-जमातींच्या लोकांना स्थान मिळाले आहे. टीममध्ये 80 टक्के लोक 60 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या युवा नेत्या पूनम महाजन सचिवाची भूमिका बजावतील. लवकरच विधानसभा निवडणुका होत असलेल्या महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडला सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळाले.