दोघांचा सात-बारा आंदोलनस्थळीच दिला

By Admin | Updated: April 24, 2015 00:55 IST2015-04-24T00:55:08+5:302015-04-24T00:55:08+5:30

श्रमिक मुक्ती दल आंदोलन : अपर जिल्हाधिकारी देवरे यांची आंदोलनस्थळी भेट

Seven-to-two agitations were given at the venue | दोघांचा सात-बारा आंदोलनस्थळीच दिला

दोघांचा सात-बारा आंदोलनस्थळीच दिला

रमिक मुक्ती दल आंदोलन : अपर जिल्हाधिकारी देवरे यांची आंदोलनस्थळी भेट
२३पंड०३
श्रमिक मुक्ती दलाच्या आंदोलनाला अपर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्याची कार्यवाही सुरू केली.
--
पंढरपूर : धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनापुढे शासन आता झुकायला लागले असून, आज पंढरपूर तहसील कार्यालयासमोर दोन धरणग्रस्तांच्या सात-बार्‍याचे तिढे खुद्द अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांनीच आंदोलनस्थळी येऊन सोडविले.
गेल्या अठरा दिवसांपासून श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु आहे. काल आंदोलकांनी उजनी धरण ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले आणि आज थेट अपर जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व त्यांच्या बहुतांश मागण्या सोडविण्याची कार्यवाही जागेवरच केली.
पंढरपुरातील अकरा गावांना महसुली दर्जा घोषित करण्याच्या प्रस्तावाला येत्या आठ दिवसांत मान्यता देण्यात येईल. शिवाय अकरापैकी पाच गावांना स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापली जाणार, दोन वर्षांपासून बंद असलेल्या भूखंड वाटपाची प्रक्रिया सुरु करुन पाच मे पर्यंत सर्व लाभार्थींचे भूखंड वाटणार असे आश्वासन अपर जिल्हाधिकारी देवरे यांनी दिले.
शिवाय तहसीलदार गजानन गुरव यांनीही त्यांच्या स्तरावर तब्बल पंधरा प्रकरणांचे नवीन शर्त शेरा कमी केला. त्या कागदपत्रांचे वाटपही दिवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रांताधिकारी संजय तेली यांच्या आदेशानुसार सुगाव येथील मंगल भोंग यांचा व आढीव देगाव येथील सुभेदार बोरकर यांचा सात-बारा उतारा दुरुस्त करुन त्यांना आंदोलनस्थळी आणून देण्यात आला.

Web Title: Seven-to-two agitations were given at the venue