शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

सेनोरिटा ओबामा

By admin | Updated: January 27, 2015 23:37 IST

सेनोरिटा, बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है... हे वाक्य त्यांनी उच्चारताच प्रचंड टाळ्या व शिट्ट्यांच्या कडकडाटाने दिल्लीतील सिरीफोर्ट सभागृह मंगळवारी आपादमस्तक दणाणून गेले

नवी दिल्ली : सेनोरिटा, बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है... हे वाक्य त्यांनी उच्चारताच प्रचंड टाळ्या व शिट्ट्यांच्या कडकडाटाने दिल्लीतील सिरीफोर्ट सभागृह मंगळवारी आपादमस्तक दणाणून गेले. कारण हे वाक्य उच्चारणारी व्यक्ती शाहरूख खान नव्हे तर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे होते. भारत दौऱ्यातले आपले अखेरचे सार्वजनिक भाषण त्यांनी येथील टाऊन हॉलमध्ये दिले. आपल्या भाषणाच्या प्रारंभी त्यांनी उपस्थितांना नमस्ते म्हणून अभिवादन केले तर अखेरीस जयहिंद म्हणून त्याचा समारोप केला. या भाषणात त्यांनी बहुत धन्यवाद, दिवाळी, भांगडा, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, मिल्खासिंग, मेरी कोम, कैलाश सत्यार्थी यांच्याविषयी सर्वांनाच अभिमान वाटतो असे म्हटले. १८९३ मध्ये अमेरिकेच्या शिकागो मध्ये स्वामी विवेकानंद यांनी, माय सिस्टर्स अ‍ॅन्ड ब्रदर्स या आपल्या भाषणाच्या सुरुवातीला उच्चारलेल्या शब्दांचे स्मरण करून आपण आजही भारतात भाषण करताना, माय सिस्टर्स अ‍ॅन्ड ब्रदर्स आॅफ इंडिया अशीच सुरुवात करत असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले.आपल्या भाषणादरम्यान त्यांनी, मागच्या भेटीत मुंबईत मुलांसोबत नृत्य केल्याची आठवण करताना या खेपेला तसे नृत्य करणे जमले नाही याविषयी खेद व्यक्त करताना शाहरुख खान याचा लोकप्रिय चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधील, सेनोरिटा, बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है... हा सुप्रसिद्ध संवाद उच्चारला आणि सभागृहातील उपस्थितांनी हास्याच्या स्फोटात टाळ््या व शिट्ट्यांनी त्याला मन:पूर्वक दाद दिली. यावेळी ओबामा यांनी त्यांच्या मागील दौऱ्यादरम्यान हूमायूंच्या मकबऱ्याजवळ भेटलेल्या विशाल नावाच्या मुलाचा उल्लेख करून त्याला शिक्षण दिले जाईल असे नमूद केले. यावेळी विशाल व सत्यार्थी सभागृहात उपस्थित होते. व्हाईट हाऊसमध्ये दरवर्षी दिवाळी साजरी करण्यात येत असल्याची माहिती देऊन त्यांनी मागील दौऱ्यात मुंबईतील भांगडा नृत्याचेही स्मरण केले.