शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष वयाच्या ६१ व्या वर्षी बांधणार लग्नगाठ, पक्षाच्या महिला कार्यकर्तीसोबत अडकणार विवाह बंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 21:14 IST

Dilip Ghosh Marriage: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालमधील माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष वयाच्या ६१ व्या वर्षी विवाह बंधनात अडकणार आहेत. माजी खासदार आणि माजी आमदार असलेले दिलीप घोष हे शुक्रवारी न्यू टाऊन स्थित आपल्या निवासस्थानी साधेपणाने होणाऱ्या विवाह सोहळ्यात  रिंकू मजूमदार यांच्यासोबत लग्नगाठ बांधतील.

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालमधील माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष वयाच्या ६१ व्या वर्षी विवाह बंधनात अडकणार आहेत. माजी खासदार आणि माजी आमदार असलेले दिलीप घोष हे शुक्रवारी न्यू टाऊन स्थित आपल्या निवासस्थानी साधेपणाने होणाऱ्या विवाह सोहळ्यात  रिंकू मजूमदार यांच्यासोबत लग्नगाठ बांधतील.

दिलीप घोष यांच्या होणाऱ्या पत्नी रिंकू मजूमदार ह्या भाजपाच्या दक्षिण कोलकातामधील सक्रिय नेत्या आणि कार्यकर्त्या आहेत. पक्षाचं काम करत असतानाच दोघेही एकमेकांना भेटले होते. तसेच आता ते विवाह बंधनात अडकणार आहेत. दिलीप घोष यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर दिलीप घोष हे निराश झाले होते. त्यावेळी  आपण एकत्र येऊया, असा प्रस्ताव रिंकू मजूमदार यांनी दिलूप घोष यांना दिला होता. रिंकू यांच्या कुटुंबात आता कुणीही नसून त्या दिलीप घोष यांच्यासोबत राहू इच्छित आहेत.

आतापर्यंत अविवाहित असलेल्या दिलीप घोष यांनी रिंकू मजूमदार यांनी दिलेला लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता. मात्र आईने आग्रह केल्यानंतर ते लग्नास तयार झाले. सहा महिन्यांपूर्वीपर्यंत दिलीप घोष यांनी विवाहाबाबत विचारही केला  नव्हता. मात्र जीवनातील हा महत्त्वाचा टप्पाही पार केला पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. दरम्यान, ३ एप्रिल रोजी ईडन गार्डवर झालेल्या आयपीएलचा सामना होणारी पत्नी आणि सासरच्या मंडळींसोबत पाहत दिलीप घोष यांनी या नात्याची अनौपचारिकरीत्या कबुलीच दिली होती.

दरम्यान, दिलीप घोष यांचा विवाह निश्चित झाल्याची वार्ता पसरल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्येही चर्चांना उधाण आले होते. याबाबत दिलीप घोष यांना विचारले असता त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिले. मी लग्न करू शकत नाही का? लग्न करणं हा गुन्हा आहे का? असे ते म्हणाले. दिलीप घोष यांनी आपण लग्न करणार असल्याचं थेटपणे सांगितलं नाही. मात्र त्यांनी हे वृत्त नाकारलंही नाही. याबाबत काही माध्यमांशी संपर्क साधला असता त्यांनी काही उत्तर दिलं नाही. मात्र त्यांच्या निकवर्तीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच त्यांनी नेहमीप्रमाणे धाडसी निर्णय घेतला आहे, असे सांगितले.   

टॅग्स :marriageलग्नBJPभाजपाrelationshipरिलेशनशिपwest bengalपश्चिम बंगाल