जयललितांच्या काळजीने आत्मदहन

By Admin | Updated: October 14, 2016 01:48 IST2016-10-14T01:48:01+5:302016-10-14T01:48:01+5:30

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या प्रदीर्घ आजारपणाने नैराश्य आलेल्या ३९ वर्षांच्या एका व्यक्तीने चेन्नई शहराच्या तम्बावरम या गजबजलेल्या

Self-reliance on Jayalalitha's care | जयललितांच्या काळजीने आत्मदहन

जयललितांच्या काळजीने आत्मदहन

चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या प्रदीर्घ आजारपणाने नैराश्य आलेल्या ३९ वर्षांच्या एका व्यक्तीने चेन्नई शहराच्या तम्बावरम या गजबजलेल्या भागात भर रस्त्यात स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा रक्षक असलेल्या आर. सरगुनम याने बुधवारी सायंकाळी तम्बावरम येथील एका औद्योगिक वसाहतीच्या बाहेर अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. ६० टक्के भाजलेल्या सरमुगनचा
नंतर इस्पितळात मृत्यू झाला. इस्पितळात दिलेल्या मृत्यूपूर्व जबानीत त्याने जयललिता यांची प्रकृती सुधारत नसल्याने आलेल्या नैराश्यातून हे आत्मघाती कृत्य केल्याचे सांगितले, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Self-reliance on Jayalalitha's care