शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांनी पूर्ण शुल्क घेऊ नये; सुप्रीम कोर्टाची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 18:36 IST

न पुरविलेल्या सुविधांवर शुल्क म्हणजे नफेखोरी

नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात शाळा बंद असून, वर्ग हे ऑनलाईन पद्धतीने घेतले. लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थ‍िक संकटाचाही सामना करावा लागल्याने संवेदनशीलतेने विचार करुन शैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे, अशी सूचना सुप्रीम कोर्टाने दिली. याममुळे लाखो पालकांना दिलासा मिळाला आहे. 

लॉकडाऊनमुळे शाळा बंद असतानाही शाळांनी संपूर्ण शुल्काची सातत्याने मागणी केली होती. पालकांची ही समस्या लक्षात घेऊन राजस्थान सरकारने आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांना ३० टक्के शुल्क कपातीचे आदेश दिले होते. याविरोधात या संस्थांनी कोर्टात धाव घेतली होती. राज्य घटनेनुसार शाळांना व्यवसाय करण्याचा मूलभूत अधिकार असल्याचा दावा शाळांनी केला होता. याचिकेवर न्या. ए. एम. खानविलकर आण‍ि न्या. दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत कोर्टाने सांगितले, की ऑनलाईन वर्ग आण‍ि शाळेत इतर उपक्रम बंद असल्याने शाळांचा एकूण खर्च कमी झाला आहे. ज्या सुविधा पुरविल्या नाहीत, त्यासाठी शुल्क आकारता येणार नाही. अशा सुविधांसाठी शुल्क आकारणे म्हणजे नफेखोरी आण‍ि व्यापारीकरण आहे.

राजस्थान सरकारचा निर्णय कायमसुप्रीम कोर्टाने राजस्थान सरकारचा निर्णय कायम ठेवतांना सांगितले, की लॉकडाऊनमुळे शाळा उघडण्याची परवानगी नसल्याने शाळांनीही मोठ्या प्रमाणात बचत केली असेल. विद्यार्थ्यांनी न वापरलेल्या सुविधांना विचारात घेऊन १५ टक्के बचत ग्राह्य धरुन शाळांनी २०२०-२१ या सत्रासाठी १५ टक्के शुल्क कपात करावी. शुल्करचना ठरवतांना पालकांनाही त्यात सहभागी करावे. 

संवेदनशीलता जपा सुनावणीदरम्यान  कोर्टाने शाळांना संवेदनशील राहण्याचे सांगितले. या  काळात विद्यार्थी आण‍ि पालकांवरही संकट आले आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे शाळांनी संवेदनशीलता दाखवून या कठीण परिस्थितीत मदत करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.खासगी शाळांवर आर्थिक ताण, चर्चा करून मार्ग काढावा; मेस्टाच्या अध्यक्षांचं आवाहनलॉकडाऊन लागू झाल्यापासून शाळांचे खर्च वाढले आहेत. कोणत्याही मनमानी निर्णयाचा परिणाम राज्यातील खासगी शाळांच्या अस्तित्वावर होऊ शकतो. गेल्या वर्षी शाळांनी विद्यार्थ्यांकडून मिळणारा शुल्काची पुनर्रचना केली. त्यामुळे शाळांवर आर्थिक ताण आला आहे. अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढू शकते. लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाची, मेहनतीची जाणीव पालकांनी ठेवायला हवी. शिक्षकांनी अधिक तास काम करून कोविड योद्धांप्रमाणे कर्तव्य बजावलं. मात्र तरीही त्यांना पगार कपातीचा सामना करावा लागला. शाळांची स्वायत्तता कायम राखण्यासाठी राज्य सरकारनं त्यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढायला हवा. खासगी शाळांच्या समस्या अधोरेखित करणारं पत्र मेस्टानं मंत्री वर्षा गायकवाड यांना ४ मार्च २०२१ रोजी दिली आहे. - मेस्टाचे अध्यक्ष संजयराव तायडे पाटील 

टॅग्स :SchoolशाळाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय