शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

‘बीफ पार्टी’ देणाऱ्या आमदारावर शाईफेक

By admin | Updated: October 20, 2015 04:19 IST

श्रीनगरच्या आमदार निवासात बीफ पार्टीचे आयोजन करणारे जम्मू-काश्मीरचे आमदार शेख अब्दुल राशिद यांच्या तोंडाला सोमवारी नवी दिल्ली येथे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी

नवी दिल्ली : श्रीनगरच्या आमदार निवासात बीफ पार्टीचे आयोजन करणारे जम्मू-काश्मीरचे आमदार शेख अब्दुल राशिद यांच्या तोंडाला सोमवारी नवी दिल्ली येथे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. बीफ पार्टी दिल्याचा निषेध नोंदवीत या कार्यकर्त्यांनी राशिद यांच्या चेहऱ्यावर शाई, रंग आणि मोबील आॅईल फेकले.९ आॅक्टोबर रोजी जम्मूच्या उधमपूर येथे गोमांस नेत असल्याच्या संशयावरून जमावाने दोन ट्रक चालकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यापैकी १९ वर्षीय झाहिदचा रविवारी मृत्यू झाला. इंजिनिअर राशिद या नावाने ओळखले जाणारे राशिद हे या दोन्ही ट्रकचालकांच्या नातेवाईकांना घेऊन नवी दिल्लीतील प्रेस क्लबमध्ये पत्रपरिषद घेण्यासाठी आले होते. राशिद हे पत्रपरिषदेला संबोधित केल्यानंतर प्रेस क्लबबाहेर काही टीव्ही पत्रकारांशी वार्तालाप करीत असतानाच, ‘गो माता का अपमान, नही सहेंगा हिंदुस्तान’ अशा घोषणा देत काही कार्यकर्ते त्यांच्या दिशेने धावत आले आणि त्यांनी राशिद यांच्या चेहऱ्यावर शाई, काळा रंग व मोबील आॅईल फेकले. दरम्यान, या शाईफेकप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि राशिद यांना संरक्षण देत त्यांना प्रेस क्लबच्या आत नेले. याआधी जम्मू-काश्मीर विधानसभेत भाजपच्या आमदारांनी राशिद यांना मारहाण केली होती, हे येथे उल्लेखनीय आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)