शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराजे पतसंस्थेची चौकशी करा

By admin | Updated: May 10, 2014 19:41 IST

गडहिंग्लजच्या सहायक निबंधकांकडे मागणी

गडहिंग्लजच्या सहायक निबंधकांकडे मागणी
गडहिंग्लज येथे सहायक निबंधक ए. एच. भंडारे यांना निवेदन देताना नारायण देवार्डे व अशोक शिंदे. शेजारी श्रीपती भोसले, काशीनाथ पाटील, आप्पासाहेब क˜ीकर, आदी.
क्रमांक : १००५२०१४-गड-०७
गडहिंग्लज :
गडहिंग्लज येथील श्री छत्रपती संभाजीराजे नागरी सहकारी पतसंस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या मनमानी व बेकायदेशीर कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी संस्था बचाव समितीतर्फे निवेदनातून येथील सहायक निबंधकांकडे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज नगरपालिका हद्दीतील मिळकत नंबर रि. स. नं. ११८/१ ब क्षेत्र ०.०६ आर म्हणजेच ४२७.५० चौ. मी. व घर नंबर ३८०९ ही आर. सी. सी. इमारत याचे क्षेत्रफळ ८१.६ चौ. मी. ही मिळकत संस्थेच्या मालकीची म्हणजेच सभासद व ठेवीदारांच्या मालकीची आहे.
तथापि, संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पाटोळे, उपाध्यक्ष अशोक देशपांडे, सचिव सदाशिव चोथे यांनी एकमेकांशी संगनमत करून स्वत: संस्थेकडील येणे कर्जे वसुलीबाबत कोणतीही कारवाई केली नाही. गेली १२ वर्षे एकहाती मनमानी कारभार करून संस्था अडचणीत आणली व संस्थेची खुली जागा व इमारत परस्पर हडप करण्याच्या इराद्याने सभासद व ठेवीदारांना विश्वासात न घेता खुली जागा व इमारत कवडीमोलाने विक्री करण्याचा फार्स केला आहे.
या प्रकारामुळे संस्थेचे, सभासद व ठेवीदारांचे नुकसान झाले आहे. या बेकायदेशीर व्यवहाराची चौकशी करून तो व्यवहार रद्द करावा आणि दोषी संचालक मंडळांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर आप्पासाहेब क˜ीकर, श्रीपती भोसले, काशीनाथ पाटील, आप्पासाहेब पाटील, नारायण देवार्डे, रामा बागडी, शामराव देसाई, संदीप सावरतकर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. (प्रतिनिधी)
प्रतिक्रिया

व्यवहार कायदेशीरच, बदनामी नको
संस्था इमारत व जागा विक्रीचा व्यवहार सहायक निबंधकांच्या परवानगीनेच रितसर कोटेशन मागवून केला आहे. स्वत:च्या व समर्थकांच्या ठेवी काढून घेऊन संस्था अडचणीत आणलेल्या आणि थकबाकीदारांनीच चौकशीची मागणी करणे म्हणजे मोठा विनोदच आहे, हा केवळ बदनामीचा प्रयत्न आहे. कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्याची आपली तयारी आहे.
- वसंतराव पाटोळे, अध्यक्ष-श्री संभाजीराजे नागरी सहकारी पतसंस्था, गडहिंग्लज.