शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सॅल्यूट ! SP मॅडमने रात्री १२ वाजता स्थलांतरीत महिलांसाठी स्वत:च्या घरीच बनवलं जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 17:52 IST

गावाकडं निघालेले लाखो प्रवासी मजूर हे गाडीचा वाट न पाहता चालतच मैलों मैल अंतर कापत आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील तिसऱ्या जिल्ह्याचा प्रवास पायीच पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे.

हैदराबाद - कोरोनानंतर देशभरात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पदोपदी माणूसकीचं दर्शन घडत आहे. अगदी निरक्षर अडाणी माणसांपासून ते उच्चविद्याविभूषित व्यक्तीही कोरोनाच्या लढाईत जोमानं काम करताना दिसून येत आहेत. कोरोनामुळे देशात आता ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आलं आहे. म्हणजे, जवळपास २ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लॉकडाऊनचा होणार आहे. या लॉकडाऊनमुळे देशाचं आर्थिक गणित बिघडलंय, तर लाखो मजूरांना हाल-अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शहरात हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ मजुरांवर आली आहे. त्यामुळे या कामगारांनी आपला घरचा रस्ता धरला आहे. 

गावाकडं निघालेले लाखो प्रवासी मजूर हे गाडीचा वाट न पाहता चालतच मैलों मैल अंतर कापत आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील तिसऱ्या जिल्ह्याचा प्रवास पायीच पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लर जिल्ह्यातून अशाच काही महिला विजयनगर येथे पायी जात होत्या. उपाशीपोटीच या महिलांचा प्रवास सुरु होता, जवळ खायलाही काही नव्हते. त्यामुळे, या महिलांनी विजयनगरच्या एसपी बी राजा कुमारी यांना फोन केला. या महिलांचा फोन आल्यानंतर, राजा कुमारी यांनी स्वत:च्या घरी या महिलांसाठी भोजन बनवलं. लेमन राईस बनवून या महिलांना स्वत: भेटून त्यांची भूक भागविण्याचं काम एसपी मॅडमने केले. 

साधारण रात्री १२ च्या सुमारास मला अननोन नंबरवरुन फोन आला. त्यावेळी, संबंधित महिलांनी, त्या गेल्या २-३ दिवसांपासून चालत असल्याचं मला सांगितलं. तसेच, पोटात अन्नाच कण नसून आम्ही ११ जण विजयनगरच्या चेकपोस्टवर आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी, मी माझ्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन जेवणाची काही व्यवस्था होतेय का ते पाहा, असे सांगितले. त्यावर, लॉकडाऊनमुळे शक्यता कमी आहे, पण आम्ही ब्रेड भेटेल का ते पाहतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर, ब्रेडही भेटल याची शाश्वती नसल्याने मी घरातच लेमन राईस बनवून चेकपोस्ट नेला, असे राजा कुमारी यांनी सांगितले. 

चेक पोस्टजवळील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये या महिला थांबल्या होत्या. या ११ जणांना मी लेमन राईस दिला, त्यांनी जेवण केलं. मग, त्यांची सोय पाहून मी पहाटे ३ ते  ४ वाजता घरी पोहोचले. गावातील कुणीतरी या महिलांना माझा नंबर दिला होता. काही अडचण असेल तर यांना कॉल करण्याचे सांगितले होते. त्यामुळे या महिलांना थेट मला कॉल केल्याचेही कुमारी यांनी म्हटले. एसपी मीरा कुमारी यांच्या या संवेदनशीलतेचं विजयनगरमध्ये कौतुक होत आहे. विजयनगर पोलिसांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन फोटो शेअर करत माहिती दिली.  

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याMigrationस्थलांतरणAndhra Pradeshआंध्र प्रदेशWomenमहिला