शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

मंडळाची मुदत संपल्याने घरेलू कामगार वार्‍यावर सन्मानधन थकले: मोलकरीण संघटनेने केली निदर्शने

By admin | Updated: March 21, 2015 00:15 IST

नाशिक- राज्य सरकारने घरेलू कामगारांसाठी स्थापन केलेल्या मंडळाची मुदत गेल्या ऑगस्ट महिन्यातच संपली असून, त्यामुळे घरेलू कामगारांची मानधन आणि अन्य सर्व योजना ठप्प झाल्या आहेत. कामगार उपआयुक्त कार्यालयाकडे यासंदर्भातील विविध शेकडो प्रकरणे अडकली आहेत. त्यामुळे सदस्य नियुक्ती करून तातडीने हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

नाशिक- राज्य सरकारने घरेलू कामगारांसाठी स्थापन केलेल्या मंडळाची मुदत गेल्या ऑगस्ट महिन्यातच संपली असून, त्यामुळे घरेलू कामगारांची मानधन आणि अन्य सर्व योजना ठप्प झाल्या आहेत. कामगार उपआयुक्त कार्यालयाकडे यासंदर्भातील विविध शेकडो प्रकरणे अडकली आहेत. त्यामुळे सदस्य नियुक्ती करून तातडीने हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.राज्य शासनाने असंघटित कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना आखल्या आहेत. त्याअंतर्गतच घरेलल कामगारांसाठी मंडळ स्थापन केले आहेत. या मंडळावर काम करणार्‍या १३ अशासकीय सदस्यांची मुदत गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यातच संपली, परंतु नवीन सत्तारूढ सरकारला त्याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने या नियुक्त्या रखडल्या नाही. त्यामुळे घरेलू कामगारांना वीमा योजना, शिष्यवृत्ती, सन्मानधन अशा ज्या योजनांसाठी मंडळाची मान्यता आवश्यक आहे, अशा प्रकारच्या सर्व मान्यता नऊ महिन्यांपासून रखडल्या आहेत. नाशिक शहरात आयटकच्या माध्यमातून चालविल्या जाणार्‍या नाशिक जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटनेच्या माध्यमातून सुमारे साडेतीनशे सन्मानधन योजनेचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. पंचावन्न वर्ष पूर्ण झालेल्या मोलकरणींना दहा हजार रुपये सन्मानधन दिले जाते. मात्र, हे प्रस्तावही रखडले आहेत. शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही, असे यासंदर्भात सांगण्यात येत असल्याने मोलकरीण संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी चौकशी केली असता कामगार उपआयुक्त कार्यालय आणि मंंडळ यांच्यात कोणताही समन्वय नसल्याचे आढळले. मुंबईत मंडळाच्या माध्यमातून चार विमा पॉलिसी काढल्याचे माहितीच्या अधिकारात उपलब्ध होत असताना कामगार उपआयुक्त कार्यालयाला एकाच पॉलिसीविषयी माहिती आहे. या सर्व प्रकारचे निराकरण करावे यासाठी घरकामगार मोलकरीण संघटनेच्या वतीने कामगार उपआयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आणि उपआयुक्त आर. आर. जाधव यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात राजू देसले, संगीता उदमले, आम्रपाली अहिरे, भारती खैरे, सुनीता कुलकर्णी, कल्पना निकम, राधा जाधव, चंद्रभागा गरुड, ज्योती धुमाळ, शोभा चव्हाण आदि सहभागी झाले होते.....इन्फो.....युतीतील वादामुळे रखडल्या नियुक्त्याराज्यात भाजपा आणि शिवसेनेचे सरकार आहे. परंतु गेल्या सहा ते आठ महिन्यांत त्यांना घरेलू कामगार मंडळाच्या सदस्यांच्या नियुक्त्या करण्यास वेळ मिळालेला नाही.भाजपा आणि शिवसेनेच्या वादात हा विषय रखडल्याचे सांगितले जात आहे.- राजु देसले, कार्याध्यक्ष, घर कामगार मोलकरीण संघटना.छायाचित्र आर फोटोवर २० मोलकरीण नावाने सेव्ह आहे.