शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
9
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
10
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
11
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
12
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
13
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
14
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
15
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
16
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

सबरीमाला प्रकरणी काँग्रेस-भाजपामध्ये एकमत, केरळमधील सर्वपक्षीय बैठक निष्फळ  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 5:59 PM

तिरुवनंतपुरम -   केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायायालयाने देऊन महिला उलटून गेला ...

तिरुवनंतपुरम -  केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायायालयाने देऊन महिला उलटून गेला आहे. मात्र या मंदिरात  सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या वादावर तोडगा काढण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र मंदिराच्या परंपरांचा हवाला देत काँग्रेस आणि भाजपाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे अजून काही वेळ मागण्याचा सल्ला केरळ सरकारला दिला आहे. तसेच या दोन्ही पक्षांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून वॉकआऊट केले. त्यामुळे ही सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरली. मात्र काँग्रेस आणि भाजपाकडून विरोध असला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यावर केरळ सरकार ठाम आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी मंदिरातील महिलांच्या प्रवेशाविषयी निश्चित धोरण तयार करण्यासाठी काही नियम बदलण्याचेही संकेत दिले आहेत.  भगवान अयप्पा यांच्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलानां प्रवेश देण्यात यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 28 सप्टेंबर रोजी दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  केरळ सरकार सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाविषयी निश्चित धोरण तयार करण्यासाठी काही नियम बदलण्याच्या विचारात आहे. तसेच महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी दिवस निश्चित करण्याचाही पर्याय सरकारसमोर आहे.  मात्र सर्वपक्षीय बैठकीतून काँग्रेस आणि भाजपाने केलेल्या वॉकआऊटनंतर केरळ सरकारसमोरील पर्यायांना मर्यादा आल्या आहेत. काँग्रेस आणि भाजपाकडून मंदिराच्या परंपरेचा हवाला देण्यात येत आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशाचे पालन करण्याचा दबाव डाव्या पक्षांच्या सरकारवर आहे.  

 

टॅग्स :Sabarimala Templeसबरीमाला मंदिरKeralaकेरळcongressकाँग्रेसBJPभाजपा