शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

आरएसएसने ‘घर वापसी’ गुंडाळली

By admin | Updated: January 3, 2015 01:39 IST

इतर धर्मात गेलेल्यांना हिंदू धर्मात पुनर्प्रवेश देण्याची ‘घर वापसी’ मोहीम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सध्यातरी हळूवारपणे बासनात गुंडाळल्याचे चित्र आहे.

नवी दिल्ली : इतर धर्मात गेलेल्यांना हिंदू धर्मात पुनर्प्रवेश देण्याची ‘घर वापसी’ मोहीम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सध्यातरी हळूवारपणे बासनात गुंडाळल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेशात हिंदुत्वाचा अजेंडा पुढे केला जात असल्याच्या मुद्यावरून विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात विरोध करीत संसदेचे कामकाज बंद पाडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आक्रमक हिंदू नेत्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती. यामुळे सरकारची विकसनशील प्रतिमा मलीन होत असल्याची चिंता मोदी यांनी व्यक्त करताच संघाच्या दिग्गजांच्या सूचनेवरून कुणालाही थांगपत्ता न लागू देता ही मोहीम स्थगित झाल्याचे बोलले जाते. १९९६ पासून धर्मजागरण मोहीम राबविणारे ५५ वर्षांचे ज्येष्ठ संघ प्रचारक राजेश्वरसिंग हे भक्कमपणे हिंदू धर्म पुनर्प्रवेश अर्थात ‘घर वापसी’ मोहिमचे नेतृत्व करीत होते. पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या भागात ते समन्वयक म्हणून काम पाहात होते. त्यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली. मोदी सरकार एकीकडे विकास कामांचा अजेंडा पुढे करीत असताना प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांच्या अट्टाहासापोटी सरकारला बॅकफुटवर यावे लागत असल्याबद्दल मोदी यांनी संघाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे ही मोहीम थांबविण्यात आल्याचे आरएसएसच्या सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे राजेश्वरसिंग यांनीही सध्यातरी कुठल्याही संघ कार्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर सातत्याने दबाव येत आहे. त्यामुळे प्रकृतीवर विपरीत परिणाम झाल्याने मी घरी विश्रांती घेणार आहे. माझ्यामते मी काही वाईट काम केलेले नाही. आरएसएसच्या दिग्गज पदाधिकाऱ्यांनी आधी मला पाठिंबा दर्शविला होता. पण या घटनेतून संघ नेहमी आपल्या भूमिकेवर ठाम नसतो, असे दिसून आले आहे.’च्सरकारची विकसनशील प्रतिमा मलीन होत असल्याची चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिग्गजांच्या सूचनेवरून कुणालाही थांगपत्ता न लागू देता ही मोहीम स्थगित झाल्याचे बोलले जात आहे. संघातील दिग्गज पदाधिकाऱ्यांसह सर्वांनी आधी माझ्या मोहिमेला बळ दिले. पण संघ प्रत्येकवेळी भूमिकेवर ठाम राहात नाही. आता संघ नेत्यांना माझी गरज नाही. पुढे कधीतरी माझी गरज त्यांना पडेलच.- राजेश्वरसिंग, ज्येष्ठ संघ प्रचारक