शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

हिंदीबाबत काँग्रेसची भूमिका सहकारी पक्षांनाही सांगावी; भाजपाने केलं काँग्रेसला ट्रोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 11:09 IST

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट करत हिंदी भाषेवरुन काँग्रेसला टोला लगावला आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विधानावरुन राजकीय वातावरण पेटू लागलं आहे. दक्षिणेतील अनेक नेत्यांनी शहांच्या वक्तव्याचा निषेध केला असून कर्नाटकातील भाजपा नेत्यांनीही कन्नड भाषेच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं आहे. 

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही ट्विट करत अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध केला. कन्नड, उडिया, मराठी, हिंदी, तामिळ, इंग्रजी, गुजराती, बांग्ला, उर्दू, पंजाबी, कोंकणी यासारख्या विविध भाषा असणे हा आपला कमकुवतपणा नाही असं अमित शहांना सांगितले आहे. मात्र यावरुन काँग्रेस आणि भाजपात ट्विटर वॉर सुरु झालं आहे. 

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट करत हिंदी भाषेवरुन काँग्रेसला टोला लगावला आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट करत हिंदी भाषेबाबत काँग्रेसची भूमिका त्यांच्या सहकारी पक्षांनाही सांगावी असं सांगितले आहे. किरण रिजिजू यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत पी. चिदंबरम हिंदी दिनाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणत आहेत की, मी अपेक्षा करतो, आपली राजभाषा हिंदी पूर्ण देशात विकसित करण्यासाठी आम्ही संपूर्णपणे प्रयत्नशील आहोत. हा व्हिडीओ 14 सप्टेंबर 2010 चा आहे. 

अमित शहांच्या वक्तव्यावर बी.एस येदियुरप्पा यांनीही ट्विट करत सांगितले आहे की, देशात सर्व भाषा एकसमान आहेत. कर्नाटकात कन्नड ही प्रमुख भाषा आहे. आम्ही कधीच कन्नड भाषेसोबत तडझोड करणार नाही. कन्नड भाषा आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असं त्यांनी सांगितले आहे. 

तर दाक्षिणात्य अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला करुन अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. देशात एक भाषा लादली जाऊ शकत नाही, असे झाल्यास मोठे आंदोलन होईल. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत कमल हासन म्हणाले, "1950 मध्ये भारत प्रजासत्ताक झाला, त्यावेळी वचन दिले होते की प्रत्येक क्षेत्रातील भाषा आणि संस्कृतीचा सन्मान केला जाईल आणि त्याला सुरक्षित ठेवले जाईल. त्यामुळे कोणताही शाह, सुल्तान  किंवा सम्राट हे वचन अचानक तोडू शकत नाही. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या देशाच्या एकतेसाठी त्याग केला आहे. मात्र, लोक आपली भाषा, संस्कृती आणि ओळख विसरू शकत नाहीत असं त्यांनी सांगितले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAmit Shahअमित शहा