शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तांदळाच्या भावात वाढ

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

पुणे :पुढील हंगामात तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने आत्तापासूनच घाऊक बाजारात येणार्‍या तांदळाच्या भावात वाढ होवू लागली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात तांदळाच्या भावात प्रति क्लिंटल ३०० ते ५०० रुपयांनी झाली. यापुढेही काही प्रमाणात ही वाढ होत राहण्याची शक्यता आहे, असे तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले.

पुणे :पुढील हंगामात तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने आत्तापासूनच घाऊक बाजारात येणार्‍या तांदळाच्या भावात वाढ होवू लागली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात तांदळाच्या भावात प्रति क्लिंटल ३०० ते ५०० रुपयांनी झाली. यापुढेही काही प्रमाणात ही वाढ होत राहण्याची शक्यता आहे, असे तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले.
मागील वर्षीपासून नैसर्गिक आपत्तीचा फटका तांदळाच्या उत्पादनावर झाला आहे. सध्याही पावसाने पाठ फिरविल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मावळ आणि भोर तालुक्यातील भात शेतीचे प्रमाणही कमी झाले आहेत. जे शेतकरी भात शेती करतात ते प्रामुख्याने आंबेमोहर आणि इंद्रायणी जातीच्या तांदळाचे उत्पादन घेतात. त्यामुळे हा भात स्थानिक पातळीवरच जास्त प्रमाणात विक्री होतो. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि इतर राज्यांमध्येही पावसाने ओढ दिल्याने तेथे भाताचे पीक पावसाअभावी जळुन जात आहे. त्याचा परिणाम म्हणजे तांदळाचे उत्पादन घटले असून शिल्लक असलेला साठ्याचाही तुटवडा जाणवत आहे. मध्यप्रदेशातून येणार्‍या तांदळाला कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. परिणामी मध्यप्रदेश येथील तांदुळ कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर जात असल्याने पुण्याच्या बाजारामध्ये तुटवडा जाणवू लागला आहे.
शहा म्हणाले, मध्यप्रदेश सीमेवरुन येणार्‍या कोलम तांदळाच्या भावात क्विंटलमागे ४०० रुपये, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्यप्रदेश येथून येणार्‍या कोलमच्या भावात ३०० ते ५०० रुपये तर सोना मसुरीमध्ये ५०० ते ६०० रुपये भाववाढ झाली आहे. ही भाववाढ कमी होण्यासाठी सप्टेबर महिन्यात पाऊस होणे आवश्यक आहे. पाऊस झाल्यास तांदळाचे भाव खाली येण्यास मदत होईल. मात्र, अपेक्षित पाऊस न झाल्यास आणखी भाववाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बासमीत तांदळाचे भावही वाढतील.
तांदूळाचे भाव पुढीलप्रमाणे : उकडा २८००-३०००, मसुरी २६००-२८००, सोनामसूरी ३०००-३३००, लचकरी कोलम ४२००-४७००, कोलम ३८००-४०००, चिन्नोर ३२००-३५००, ११२१ - ६५००-७५००, आंबेमोहोर (सुवासिक) ४६००-५४००, बासमती अखंड ८५००-९०००, बासमती दुबार ६०००-६५००, बासमती तिबार ७०००-७५००, बासमती मोगरा ३३००-३६००, बासमती कणी २३००-२५००, सरबती ४०००-४५००, सेला बासमती ५०००-६०००.
---------