क्रांती : आता सरोगेट आईनंतर चक्क सरोगेट गायीसुद्धायेणार! माफसूच्या प्रयत्नांना यश; ईटीटी-आयव्हीएफची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 07:09 IST2026-01-31T07:08:33+5:302026-01-31T07:09:01+5:30

Surrogate Cows News: ज्या दाम्पत्याला स्वतः गर्भधारणा करणे शक्य नसते त्यांच्यासाठी दुसरी महिला गर्भधारणा करते. तिला सरोगेट मदर (आई) म्हणतात! असाच आविष्कार ईटीटी-आयव्हीएएफ जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने गायीवर करणे शक्य झाले आहे.

Revolution: Now after surrogate mothers, surrogate cows will also come! Maafsu's efforts are successful; ETT-IVF is the best | क्रांती : आता सरोगेट आईनंतर चक्क सरोगेट गायीसुद्धायेणार! माफसूच्या प्रयत्नांना यश; ईटीटी-आयव्हीएफची कमाल

क्रांती : आता सरोगेट आईनंतर चक्क सरोगेट गायीसुद्धायेणार! माफसूच्या प्रयत्नांना यश; ईटीटी-आयव्हीएफची कमाल

- जितेंद्र ढवळे
नागपूर - ज्या दाम्पत्याला स्वतः गर्भधारणा करणे शक्य नसते त्यांच्यासाठी दुसरी महिला गर्भधारणा करते. तिला सरोगेट मदर (आई) म्हणतात! असाच आविष्कार ईटीटी-आयव्हीएएफ जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने गायीवर करणे शक्य झाले आहे. यामुळे दुग्ध उत्पादनवाढीसाठी उच्च दर्जाचे वासरू जन्माला घालणे शक्य झाले आहे.

केंद्र सरकारचे राष्ट्रीय गोकुळ मिशन आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मदतीने नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात उभारलेल्या भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान (ईटीटी) आणि कृत्रिम परिवेषीय निषेचन (आयव्हीएफ) प्रयोगशाळेत हा आविष्कार साकारला जातोय. या माध्यमातून दुग्ध उत्पादनाची उच्च अनुवांशिकता असलेल्या साहिवाल, गीर, गवळाऊ, डांगी, देवनी या देशी गायींचे पुनरुत्पादन केले जात आहे.

किती मिळाले यश? : वडसा येथील वळू माता संगोपन केंद्र, देवलापार येथील गो-विज्ञान अनुसंघान केंद्र आदी ठिकाणी प्रयोग करून १५८ गायींमध्ये आयव्हीएफद्वारे गर्भधारणा झाली असून ७२ सुदृढ वासरे जन्माला आली आहेत.

ईटीटी-आयव्हीएफ म्हणजे नेमके काय असते?
- देशी गोवंशाचे संवर्धन व दूध उत्पादनात गुणात्मक वाढ साधण्यासाठी इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) आणि त्यावर आधारित एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी (ईटीटी) या तंत्रज्ञानाचा वापर हा गोपालन क्षेत्रात केला जात आहे.
-या जैवतंत्रज्ञानात उच्च दुग्ध उत्पादन क्षमता असणाऱ्या देशी गोवंशाच्या दाता गायीच्या गर्भाशयाच्या बिजांडावरील बीजकोषातून स्त्री बीजे अल्ट्रासोनोग्राफीच्या मदतीने एका नलिकेतून शोषून घेतले जातात.
-नंतर भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेत स्त्री बिजांना विशिष्ट वातावरणात परिपक्व करून पुरुष बिजाद्वारे म्हणजेच शुक्रानूद्वारे फलन केले जाते. यातून निर्माण झालेला भ्रूण (टेस्ट ट्यूब बेबी) आठ दिवस वाढवून प्रत्यारोपणासाठी तयार केला जातो.
-हा तयार झालेला भ्रूण कमी दुग्ध उत्पादन क्षमता असणाऱ्या गायीच्या गर्भाशयात विना शस्त्रक्रिया प्रत्यारोपित करण्यात येतो.

 

Web Title : क्रांति: अब सरोगेट गायें भी संभव, ईटीटी-आईवीएफ तकनीक से!

Web Summary : ईटीटी-आईवीएफ के माध्यम से सरोगेट गायें अब एक वास्तविकता हैं, जिससे दूध उत्पादन में वृद्धि होगी। भ्रूण स्थानांतरण तकनीक साहीवाल और गिर जैसी उच्च उपज वाली स्वदेशी नस्लों के प्रजनन में मदद करती है। आईवीएफ के माध्यम से 72 स्वस्थ बछड़े पैदा हुए, जो डेयरी फार्मिंग में एक महत्वपूर्ण सफलता है।

Web Title : Revolution: Surrogate Cows Now Possible with ETT-IVF Technology!

Web Summary : Surrogate cows are now a reality through ETT-IVF, boosting milk production. Embryo transfer technology helps reproduce high-yielding indigenous breeds like Sahiwal and Gir. 72 healthy calves born via IVF, marking a significant success in dairy farming.