शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

राजीनाम्यांनी सेन्सॉर बोर्ड हादरले

By admin | Updated: January 17, 2015 06:50 IST

सरकारच्या धोरणावर आगपाखड करीत सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांच्यापाठोपाठ सदस्य इरा भास्कर यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे

नवी दिल्ली : सरकारच्या धोरणावर आगपाखड करीत सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांच्यापाठोपाठ सदस्य इरा भास्कर यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. डेरा सच्चाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मेसेंजर आॅफ गॉड’ या वादग्रस्त चित्रपटाला चित्रपट प्रमाणीकरण अ‍ॅपिलेट लवादाने (एफसीएटी) मंजुरी दिल्यानंतर सॅमसन यांनी तडकाफडकी राजीनाम्याचा निर्णय घेतला. मंडळाने मनाई केली असतानाही एफसीएटीने प्रदर्शनाला मंजुरी दिल्याने त्या नाराज झाल्या. सेन्सॉर बोर्डात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नियुक्त केलेले सदस्य आणि अधिकारी संगनमत करीत भ्रष्टाचारात गुंतले असून ते कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप करीत त्यांनी सरकारला धारेवर धरले. दरम्यान माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी मंडळाच्या कामकाजात कुठलाही हस्तक्षेप नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले. संपुआ सरकारच्या काळात स्थापन झालेल्या सेन्सॉर बोर्डाचे उर्वरित सदस्य एम.के. रैना, पंकज शर्मा, राजीव मसंद, अंजुम राजा बली, शुभ्रा गुप्ता आणि शाजी हे येत्या दोन दिवसांत राजीनामे देतील असे तर्कवितर्क सुरू आहेत. ‘मॅसेंजर आॅफ गॉड’ या चित्रपटाचा शुक्रवारी गुरगाव येथे होणारा प्रिमियर शो रोखण्यात आला आहे.सॅमसन यांची तीन वर्षांची कारकीर्द एप्रिल २०१४ मध्ये संपली होती मात्र मोदी सरकारने नवी नियुक्ती न केल्याने त्या पदावर कायम होत्या. सदस्यांचीही अशीच अवस्था होती. जुलैमध्ये मंडळाने पुढील नोटिशीपर्यंत मुदतवाढ दिल्याचे नमूद केले होते. इरा भास्कर यांचीही नाराजी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य इरा भास्कर यांनीही राजीनामा देत या संवैधानिक मंडळाच्या कामकाज पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)