शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

"आरक्षण म्हणजे दलितांच्या कपाळावरचा कलंक; जे भीकेत दिलेल्या वस्तूसारखं वाटतं...!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 14:17 IST

मांझी म्हणाले, आरक्षणाद्वारे नोकरी मिळालेल्या व्यक्तीकडे नेहमीच हीन भावनेने पाहिले जाते. त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. असे वाटते, की आरक्षण देऊन उपकार केले आहेत. कॉमन स्कूलिंग सिस्टिमनंतर याची गरज राहणार नाही.

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी आरक्षणासंदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे. मांझी म्हणाले, आरक्षणामुळे दलितांच्या कपाळावर कलंक लागल्यासारखा झाला आहे, जे भीकेत दिलेल्या वस्तूसारखे वाटू लागले आहे. जर देशात कॉमन स्कूलिंग सिस्टिम लागू करण्यात आली, तर दहा वर्षांनंतर आरक्षणाची गरजच उरणार नाही. जीतनराम हे दिल्लीत येते आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.

मांझी म्हणाले, आरक्षणाद्वारे नोकरी मिळालेल्या व्यक्तीकडे नेहमीच हीन भावनेने पाहिले जाते. त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. असे वाटते, की आरक्षण देऊन उपकार केले आहेत. भीमराव आंबेडकरांनी स्वतःच दहा वर्षांनंतर आरक्षणासंदर्भात समीक्षा करण्यात यावी, असे म्हटले होते, अशी आठवणही जीतनराम मांझी यांनी करून दिली.

'कॉमन स्कूलिंग सिस्टम लागू व्हावी' -जीतनराम मांझी म्हणाले, जगातील इतर अनेक देशांप्रमाणेच भारतातही कॉमन स्कूलिंग सिस्टम लागू व्हायरला हवी. असे झाल्यास आरक्षणाची गरजच भासणार नाही. कॉमन स्कुलिंग व्यवस्थेत राष्ट्रपतींच्या मुलापासून ते दलीत समाजातील मुलांपर्यंत सर्व जण एकाच शाळेत शिकतील. जेणेकरून दोघांनाही समान संधी मिळतील. अशी व्यवस्था निर्माण झाल्यानंतर, दहा वर्षांनी पुन्हा आरक्षणाची आवश्यकता आहे, की नाही, याची समीक्षा करायला हवी. यावेळी स्वतःचे उदाहरण देत मांझी म्हणाले, आपण शिक्षित असल्यामुळेच तर जीवनात उच्च स्थान प्राप्त करू शकलो.

'दुहेरी मतदार प्रणाली लागू  करावी' -दलितांच्या उत्थानासाठी मांझी यांनी आंबेडकरांची दुहेरी मतदार पद्धती लागू करण्याची मागणी केली. मांझी म्हणाले, या व्यवस्थेअंतर्गत दलितांना दुहेरी मतदानाचा अधिकार मिळेल. एक, असे मतदारसंघ निवडले जावेत, जे केवळ दलितांसाठीच आरक्षित असतील आणि तेथे केवळ दलितांनाच मतदानाचा अधिकार असेल. दुसरे म्हणजे, दलितांना आपापल्य मतदारसंघातही सार्वत्रिक निवडणुकांमध्येही सहभाग घेता येईल. यावेळी मांझी यांनी दावा केला की, या प्रणालीद्वारे दलितांचे नेते दलितांच्या मतांनीच निवडून येतील. जेणेकरून त्यांची प्राथमिकता केवळ दलितांचा विकास आणि उन्नती असेल. 

टॅग्स :Biharबिहारreservationआरक्षणPoliticsराजकारण