शहरं
Join us  
Trending Stories
1
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
2
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
3
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
4
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
5
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
6
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
7
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
8
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
9
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
10
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
11
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
12
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
13
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
14
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
15
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
16
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
17
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
18
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
19
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
20
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

"२४ तासांत उत्तर द्या, अन्यथा..."; स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना प्रशासनाची दुसरी नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:47 IST

तुम्ही स्वत:ला शंकराचार्य सांगत मेळ्यात बोर्ड लावले आहेत. परंतु तुम्ही शंकराचार्य असण्यावर सुप्रीम कोर्टाने बंदी आणली आहे असं प्रशासनाने नोटिशीत म्हटले.

प्रयागराज - स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि माघ मेळा प्रशासनातील संघर्ष आणखी वाढला आहे. ४८ तासांच्या आत प्रशासनाने अविमुक्तेश्वरानंद यांना दुसरी नोटीस पाठवली आहे. मौनी अमावस्येला बॅरिकेड्स तोडणे, बळजबरीने जमावात पालखी घुसवणे यावरून प्रशासनाने प्रश्न उपस्थित केले आहेत. जर २४ तासांत तुमच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर संस्थेला दिलेली जमीन आणि इतर सुविधा काढून घेतल्या जातील आणि आपल्याला कायमचे माघ मेळ्यातून बंदी घातली जाईल असा इशाराच प्रशासनाने दिला आहे.

अविमुक्तेश्वरानंद यांचे मिडिया प्रभारी शैलेंद्र योगिराज यांनी म्हटलं की, प्रशासनाने बुधवारी रात्री ७ वाजता शिबिरामागे नोटीस चिपकवली, ज्यावर १८ जानेवारी तारीख लिहिली होती. गुरुवारी सकाळी ८ वाजता ३ पानी दुसऱ्या नोटिशीला उत्तर मेळा प्रशासन ऑफिसला पाठवले आहे. या उत्तरात अविमुक्तेश्वरानंद यांच्याकडून घडलेल्या घटनेवर भाष्य करण्यात आले आहे. काही अधिकाऱ्यांनी जाणुनबुजून सुव्यवस्था बिघडवण्याचे काम केले. त्यानंतर आरोप आमच्यावरच टाकण्याचा प्रयत्न झाला. सीसीटीव्हीत सत्य दिसत आहे. आमच्याकडे रथ नव्हता, पालखीने संगम स्नानासाठी जात होतो असं त्यांनी सांगितले.

तर तुम्ही स्वत:ला शंकराचार्य सांगत मेळ्यात बोर्ड लावले आहेत. परंतु तुम्ही शंकराचार्य असण्यावर सुप्रीम कोर्टाने बंदी आणली आहे असं प्रशासनाने नोटिशीत म्हटले. त्यावर याविषयी तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांनी न बोललेले बरे, या बाबतीत माझ्या वकिलांकडून २० जानेवारीला ई मेलच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर देण्यात आले आहे. ज्योतीष्पीठाचे शंकराचार्य पदाबाबत खटला सुप्रीम कोर्टात आहे. जोपर्यंत त्यावर आदेश येत नाही तोपर्यंत कुणीही शंकराचार्य घोषित होऊ शकत नाही. तरीही तुम्ही स्वत:ला शंकराचार्य लिहून सुप्रीम कोर्टाचा अवमान करत आहात असा आरोप प्रशासनाने केला.

दरम्यान, प्रशासनाने पाठवलेली नोटीस ही मनमानी आणि बेकायदेशीर आहे. जर ही नोटीस परत घेतली नाही तर त्यांच्यावर मानहानीचा दावा करू. माजी शंकराचार्य स्वरुपानंद यांनी वारसा माध्यमातून मला शंकराचार्य नियुक्त केले होते. सुप्रीम कोर्टाचा असा कुठलाही आदेश नाही ज्यातून ते मला शंकराचार्य बनण्यापासून रोखू शकतात असं उत्तर अविमुक्तेश्वरानंद यांनी दिले आहे. तर दुसरीकडे अविमुक्तेश्वरानंद यांच्या समर्थनार्थ अनेक साधू संत पुढे आलेत. जगद्गुरु रामानुजाचार्य यांनी प्रशासनाला इशार दिला. प्रशासनाने अविमुक्तेश्वरानंद यांची माफी मागून हा वाद मिटवावा. गरज भासली तर संत समाज दिल्लीत आंदोलन करेल असं त्यांनी म्हटलं. 

काय घटना घडली?

१८ जानेवारीला मौनी अमावस्येमुळे माघ मेळ्यात अविमुक्तेश्वरानंद पालखीतून स्नान करण्यासाठी जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखत पायी चालत जाण्यास सांगितले. यावेळी मोठा गोंधळ झाला. अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिष्यांनी पोलिसांच्या कारभाराला विरोध केला तेव्हा तिथे धक्काबुक्की झाली. त्यातून अविमुक्तेश्वरानंद यांनी त्यांच्या शिबिराबाहेर धरणे आंदोलन सुरू केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ultimatum to Swami Avimukteshwaranand: Eviction Threat Over Magh Mela Dispute

Web Summary : Swami Avimukteshwaranand faces eviction from Magh Mela after allegedly breaking barricades. Authorities demand explanation within 24 hours, citing Supreme Court restrictions on declaring oneself Shankaracharya. Supporters rally, threatening protests if the notice isn't withdrawn.
टॅग्स :Prayagrajप्रयागराजUttar Pradeshउत्तर प्रदेश