शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

बाळंतपणाची रजा आता होणार दुप्पट

By admin | Updated: December 30, 2015 03:45 IST

खासगी क्षेत्रात कार्यरत महिलांना मिळणाऱ्या प्रसूती रजेत वाढ करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी मंगळवारी यास दुजोरा दिला. या निर्णयानुसार

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रात कार्यरत महिलांना मिळणाऱ्या प्रसूती रजेत वाढ करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी मंगळवारी यास दुजोरा दिला. या निर्णयानुसार, खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या महिलांना प्रसूती काळात मिळणारी १२ आठवड्यांची रजा आता २६ आठवड्यांची करण्यात येणार आहे.कामगार कायद्यानुसार, प्रसूती काळात महिला नोकरदारांना सध्या १२ आठवड्यांची भरपगारी रजा मिळते. प्रसूती आणि त्यानंतरच्या काळात बाळाच्या दैनंदिन पालनपोषणासाठी मातेला दिल्या जाणाऱ्या रजेत वाढ करून, ती साडेसहा महिन्यांची करण्याबाबतचे लेखी पत्र कामगार मंत्रालयास पाठविण्यात आले होते. त्यास कामगार मंत्रालयानेही सहमती दर्शवली आहे, असे मनेका यांनी सांगितले.यासाठी ‘मॅटर्निटी बेनेफिट्स अ‍ॅक्ट’मध्ये दुरुस्ती करावी लागेल. अलीकडेच महिला कल्याण मंत्रालयाने मालक, केंद्रीय कामगार संघटना आणि सरकारी अधिकारी यांची त्रिपक्षीय बैठक घेतली होती. त्यातही ही रजा २६ आठवड्यांची करण्यावर सहमती झाली होती. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनेही कामगार कल्याणाचा एक भाग म्हणून प्रसूतीकाळाच्या रजेवर भर दिला आहे. मातेच्या स्तनपानाने नवजात अर्भकास अनेक संभाव्य व्याधींपासून संरक्षण मिळते. शिवाय भावनिक नाते दृढ होण्यासाठीही बाळ सुरुवातीचे काही महिने मातेच्या सान्निध्यात असणे लाभदायी असते. (लोकमत न्यूज नेटवर्क)