शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’ आणण्याऐवजी भाजपाच्या पळवाटा

By admin | Updated: June 18, 2014 05:29 IST

महागाई वाढण्यास साठेबाजी कारणीभूत असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : महागाई वाढण्यास साठेबाजी कारणीभूत असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला. सरकार आपले अपयश झाकण्यासाठी तसेच आश्वासन दिल्याप्रमाणे चांगले दिवस आणण्यात असमर्थ ठरत असल्याने कारणे शोधत असल्याची टीका काँग्रेसने केली. सरकारमधील भ्रष्टाचारामुळे वस्तूंच्या किमती वाढल्याचे भाजपा विरोधी पक्ष असताना छातीठोकपणे सांगत होता. सरकारमध्ये असताना काँग्रेस महागाईसाठी जी कारणे देत होता, भाजपा त्याचा विरोध करीत होता आणि आता सत्तेत आल्यावर भाजपाला ती कारणे योग्य वाटत आहेत, असे काँग्रेस सरचिटणीस अजय माकन म्हणाले.साठेबाजीमुळे महागाई वाढल्याचे सांगून अरुण जेटली यांनी महागाई रोखण्यासाठी साठेबाजीला आळा घालण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या. मोदींनी काही दिवसांपूर्वी अर्र्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे म्हटले होते. जेटली यांचे वक्तव्य त्याच्याशी मिळते-जुळते असल्याचे समजण्यात येत आहे. जनतेच्या आशा- आकांक्षा पूर्ण करू शकत नसल्याने आणि निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे चांगले दिवस येऊ शकत नसल्याने भाजपा आणि सरकार आपल्या अपयशासाठी कारणे शोधत आहे, असे माकन म्हणाले.लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आने वाले है’ हे गाजलेले घोषवाक्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे होते. सरकार पुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यास कटिबद्ध आहे. दुसरीकडे राज्य सरकारांना तुटवड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी साठेबाजांवर लक्ष ठेवावे लागेल, असे जेटली म्हणाले. सरकार चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करीत आहे. पंतप्रधानांनी अर्थव्यवस्था बिकट असल्याचे सांगून काही कठोर पावले उचलावे लागतील, असे याआधी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)