शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तडजोडीनंतरही बलात्कार, खुनाचा गुन्हा रद्द केला जाऊ शकत नाही

By admin | Updated: July 30, 2014 01:08 IST

पीडित आणि आरोपीमध्ये तडजोड झाल्यावरदेखील बलात्कार आणि खुनासारख्या गंभीर आरोपांमध्ये फौजदारी कारवाई रद्द केली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : पीडित आणि आरोपीमध्ये तडजोड झाल्यावरदेखील बलात्कार आणि खुनासारख्या गंभीर आरोपांमध्ये फौजदारी कारवाई रद्द केली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. असे केल्यास त्याचा समाजावर वाईट परिणाम होईल, असे न्यायालय म्हणाले. 
सार्वजनिक शांततेशी संबंधित नसलेला आणि दोन व्यक्ती किंवा समूहार्पयत मर्यादित असलेला गुन्हा दोन्ही पक्षामध्ये समझोत्या झाल्यानंतर रद्द केला जाऊ शकतो, असे न्या. रंजना प्रकाश देसाई आणि न्या. एन.व्ही. रमण यांचे पीठ म्हणाले. 
उच्च न्यायालय कारवाई रद्द करण्याबाबत आपल्या विवेकाचा वापर करू शकते. ते संबंधित प्रकरणातील तथ्य आणि परिस्थितींवर अवलंबून असेल. परंतु बलात्कार आणि खून यासारख्या गंभीर गुन्हा असलेल्या प्रकरणात कारवाई रद्द केली जाऊ शकत नाही. कारण यामुळे समाजावर हानिकारक परिणाम होऊ शकतो, असे पीठ म्हणाले. 
गंभीर गुन्हा असलेल्या प्रकरणात असे म्हटले जाऊ शकत नाही की, ते प्रकरण दोन व्यक्ती किंवा समूहार्पयत मर्यादित आहे आणि असे गुन्हे रद्द केल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. ज्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला असेल, अशा प्रकरणात दम राहत नाही आणि ते प्रकरण पुढे रेटल्यास वेळ आणि शक्ती वाया जाते, असेही न्यायालय 
म्हणाले. 
सर्वोच्च न्यायालयाने विविध दोषींनी दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश दिला. पीडितांबरोबर आमचा सौहार्दपूर्ण समझोता झाला आहे. त्यामुळे आमच्याविरुद्धची प्रलंबित कारवाई रद्द करण्यात यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
सामाजिक शांततेला तडा जाणार नसल्यास हरकत नाही
च्गुन्हा वैयक्तिक स्वरूपाचा आहे आणि दोन्ही पक्षांमध्ये समझोत्यामुळे सार्वजनिक शांततेला तडा जाणार नाही किंवा त्यामुळे सार्वजनिक शांतता टिकून राहण्यास मदत मिळू शकते, असे न्यायालयाला  वाटल्यास अशावेळी गुन्हा रद्द केला जाण्यास काहीच हरकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.