शहरं
Join us  
Trending Stories
1
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
4
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
5
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
6
Top Marathi News LIVE: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक, १२ जणांचा मृत्यू, ३५ जखमी
7
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
8
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
9
ओट्स की पोहे... वेट लॉस आणि एनर्जीसाठी एकदम परफेक्ट आहे 'हा' नाश्ता; फायदे एकदा वाचाच
10
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
11
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
12
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
13
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
14
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
15
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
16
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
17
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
18
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
20
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

मामाकडून अल्पवयीन भाचीवर बलात्कार

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST

संशयिताला अटक : कातवण येथील घटनेने खळबळ

संशयिताला अटक : कातवण येथील घटनेने खळबळ
पुरळ : देवगड तालुक्यातील कातवण गावातील मामानेच अल्पवयीन भाचीवर बलात्कार केला आहे. देवगड पोलिसांनी याप्रकरणी संशयिताला अटक केली आहे.
देवगड तालुक्यातील कातवण येथील पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मामाकडे आजोळी ९ सप्टेंबर ते २७ जानेवारी २०१५ दरम्यानच्या कालावधीत राहण्यासाठी आली होती. मामाकडे राहत असतानाच या पीडित मुलीच्या मामाने तिच्यावर वारंवार जबरी बलात्कार केला. तसेच ही गोष्ट घरात कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
आजोळी राहिल्यानंतर ही मुलगी जानेवारी २०१५ अखेर आपल्या राहत्या ठिकाणी आई-वडिलांकडे मुंबई येथे गेली होती. ती मुंबईत गेल्यावर अचानक आजारी पडल्यामुळे तत्काळ आई-वडिलांनी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले.
या प्रकाराने जबरदस्त हादरा बसलेल्या मुलीच्या आई-वडिलांनी त्या मुलीकडे विचारणा केली असता सत्य समोर आले. मुलीने आई-वडिलांना आपल्या मामानेच आजोळी असताना वारंवार बलात्कार केल्याचे सांगितले.
या घटनेने सुन्न झालेल्या त्या मुलीच्या आई-वडिलांनी मुंबई येथील टिळकनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. ही घटना देवगड तालुक्यात घडल्यामुळे टिळकनगर पोलिसांनी देवगड पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार शून्य नंबरने पाठविली. यावरून देवगड पोलिसांनी मुलीच्या मामाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरिक्षक माधुरी पाटे करीत आहेत. (वार्ताहर)