शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

थायलंडमधल्या 'रामा'चं निधन, नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त

By admin | Updated: October 13, 2016 21:29 IST

थायलंडमध्ये भगवान रामासमान असलेले राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचं निधन झालं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - थायलंडमध्ये भगवान रामासमान असलेले राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचं निधन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान म्हणाले, त्यांना त्यांच्या लोकांमध्ये खूप मोठा सन्मान होता. माझी सहवेदना त्यांचे कुटुंबीय आणि शुभचिंतकांसोबत आहे. थायलंडचे राजा भूमिबोल यांनी जगात सर्वाधिक जास्त काळ राज्य करणारे सम्राट म्हणून ओळखले जातात.
थायलंडचे लोक त्यांना एका वेगळ्याच उंचीवरून पाहत असे. त्यांचं व्यक्तिमत्त्व कनवाळू वडिलांसारखं होतं. राजकारणाच्या वरचं स्थान त्यांना प्राप्त होतं. त्यांना एका देवासमान थायलंडमधलं पुजलं जायचं. 1932मध्ये थायलंडमधली राजेशाही संपवण्यात आली. 1935मध्ये भूमिबोल यांचे काका प्रजादीपोक यांनी राजाचं पद सोडलं. त्यानंतर राजाचं पद भूमिबोल यांचे मोठे बंधू आनंद यांना बहाल करण्यात आलं. त्यावेळी आनंद हे फक्त 9 वर्षांचे होते.
 
1946मध्ये राजा आनंद यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यानंतर वयाच्या 18व्या वर्षी भूमिबोल राजसिंहासनाच्या गादीवर विराजमान झाले. त्यानंतर त्यांनी अविरतपणे जनतेची सेवा केली. भूमिबोल यांना फोटो काढणं, खेळण्याचा छंद होता. ते गाणेही लिहित असत. फ्रान्समध्ये थायलंडचे राजदूत असलेल्या व्यक्तीच्या मुलीशी त्यांचं लग्न झालं. त्यानंतर बँकॉकमध्ये नवे सम्राट म्हणून त्यांचं राज्यरोहण करण्यात आलं.