शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेत विरोधकांना समित्यांवर झुकते माप, आठ समित्यांच्या नेमणुकांना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 04:44 IST

यंदा विविध संयुक्त संसदीय स्थायी समित्यांच्या चेअरमन पदांच्या नेमणुका करताना राज्यसभेतील विरोधी पक्ष सदस्यांना झुकते माप देण्यात आले आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : यंदा विविध संयुक्त संसदीय स्थायी समित्यांच्या चेअरमन पदांच्या नेमणुका करताना राज्यसभेतील विरोधी पक्ष सदस्यांना झुकते माप देण्यात आले आहे.याआधीच्या दोन वर्षांत विरोधी पक्ष सदस्यांना वरिष्ठ सभागृहातील चार स्थायी समित्या देण्यात आल्या होत्या. यंदा पाच समित्या विरोधकांना मिळाल्या आहेत. राज्यसभेचे उपसभापती एम. वेंकय्या नायडू यांनी आठ स्थायी समित्यांच्या चेअरमनपदांच्या नेमणुकांना मंजुरी दिली. त्यातील तीन पदे भाजपला मिळाली आहेत; तर उर्वरित पाच पदे विरोधी पक्षांना मिळाली आहेत.लोकसभेंतर्गत १६ खात्यांशी संबंधित स्थायी समित्यांवरील (डीआरएससी) राज्यसभेच्या नामांकनांनाही नायडू यांनी मंजुरी दिली. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी या समित्यांची स्थापना आणि त्यांच्या चेअरमन पदाच्या नेमणुकांना याआधीच मान्यता दिलेली आहे.राज्यसभेच्या डीआरएससीपैकी दोन समित्यांवर काँग्रेस सदस्य आनंद शर्मा आणि जयराम रमेश यांच्या नेमणुका झाल्या आहेत. शर्मा यांना गृह व्यवहार समितीचे, तर रमेश यांना विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण व वने समितीचे चेअरमन करण्यात आले आहे. सपाचे रामगोपाल यादव यांना आरोग्य व कुटुंब कल्याण समिती, टीआरएसचे डॉ. के. केशव राव यांना उद्योग समिती आणि वायएसआर काँग्रेसचे व्ही. विजय साई रेड्डी यांना वाणिज्य समिती प्रमुखपदी नेमण्यात आले आहे.भाजपचे सत्यनारायण जतिया, भूपेंद्र यादव आणि टी. जी. वेंकटेश या तिघांना स्थायी समित्यांची चेअरमन पदे मिळाली आहेत. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने आपला दोन समित्यांचा कोटा कायम राखलाआहे.वेंकय्या नायडू यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला आणि सांसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर समित्यांच्या नेमणुका जाहीर केल्या. १६ समित्या लोकसभेच्या कक्षेत येतात. खात्याशी संबंधित स्थायी समित्यांची दोन्ही सभागृहांतील एकूण संख्या २४ आहे.>काँग्रेस-भाजपमध्ये धुमशानमहत्त्वाच्या मंत्रालयांच्या संसदीय समित्यांची अध्यक्षपदे काँग्रेसकडून काढून घेतल्याने मोदी सरकार व काँग्रेसमध्ये धुमशान सुरू झाले आहे. काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांनी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. चौधरी यांनी लोकमतला सांगितले की, काँग्रेसने स्थायी समित्यांमध्ये राफेल, डोकलामसारखे मुद्दे उपस्थित केल्यामुळेच सरकारने महत्त्वाची अध्यक्षपदे हिसकावून घेतली आहेत, असा आमचा स्पष्ट आरोप आहे.सरकारने म्हटले आहे की, भाजप व सहयोगी पक्षांची सदस्य संख्या दोन्ही सभागृहांत पहिल्यापेक्षा खूपच वाढली आहे. त्यामुळे महत्त्वाच्या मंत्रालयांच्या स्थायी समित्यांची अध्यक्षपदे काँग्रेसला देता येणार नाहीत. यावर चौधरी म्हणाले की, मागील तुलनेत लोकसभेत काँग्रेसची सदस्य संख्याही वाढली आहे. त्यामुळे पूर्वीची अध्यक्षपदे कायम ठेवली पाहिजेत. सरकारने याचा फेरविचार करावा अन्यथा काँग्रेस जोरदार विरोध करील.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा