स्वत:च्या जीवनावरील चित्रपट रजनीकांतने रोखला!

By admin | Published: September 18, 2014 01:30 AM2014-09-18T01:30:17+5:302014-09-18T11:06:52+5:30

रजनीकांतने आपल्याच जीवनावर बेतलेल्या ‘मै हूँ रजनीकांत’ या बॉलीवूड चित्रपटाच्या प्रदर्शनास मद्रास उच्च न्यायालयाकडून अंतरिम मनाई हुकूम मिळविला आहे.

Rajinikanth stopped the film in his own life! | स्वत:च्या जीवनावरील चित्रपट रजनीकांतने रोखला!

स्वत:च्या जीवनावरील चित्रपट रजनीकांतने रोखला!

Next
चेन्नई : तमिळ चित्रपटसृष्टीतील सजीव दंतकथा म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार शिवाजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत याने आपल्याच जीवनावर बेतलेल्या ‘मै हूँ रजनीकांत’ या बॉलीवूड चित्रपटाच्या प्रदर्शनास मद्रास उच्च न्यायालयाकडून अंतरिम मनाई हुकूम मिळविला आहे.
 मुंबईत मालाड (प.) येथील रिझवी मॅन्शन को. ऑप. सोसायटीत कार्यालय असलेल्या वर्षा प्रॉडक्शन्सतर्फे ‘मै हूँ रजनीकांत’ हा चित्रपट काढला जात आहे. हा चित्रपट आपली संमती न घेताच काढला जात आहे व त्यात दाखविल्या जाणा:या आपल्या जीवनचरित्रने आपल्यावर अलोट प्रेम करणा:या कोटय़वधी चाहत्यांच्या मनात अनाठायी गोंधळ आणि संभ्रम निर्माण होईल. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनास मनाई करावी, असा दिवाणी दावा सुपरस्टार रजनीकांत याने स्वत: मद्रास उच्च न्यायालयात केला आहे. त्यात तातडीच्या मनाईसाठी केलेल्या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्या. एस. तमिलवानन यांनी ‘मै हूँ रजनीकांत’ या नावाचा व तशा आशयाचे कथानक असलेला चित्रपट प्रदर्शित करण्यास वर्षा प्रॉडक्शन्सला अंतरिम मनाई करणारा आदेश 
दिला. रजनीकांत याने आपल्या दाव्यात म्हटले की, रुपेरी पडद्यावरील मी वठविलेल्या अनोख्या भूमिका व प्रत्यक्ष जीवनात कटाक्षाने जपलेला साधेपणा व विनम्रता यामुळे देशभरातील कोटय़वधी चाहते माङयावर जीवापाड प्रेम करतात. त्यामुळे हा चित्रपट माङया संमतीनेच तयार करण्यात आला आहे असा भाबडा समज करून घेऊन लोक हा चित्रपट पाहतील व त्यातून नाहक गोंधळ उडेल. शिवाय माङो नाव व व्यक्तिमत्व घेऊन माङयासारख्याच दिसणा:या दुस:या कोणीतरी पडद्यावर ते उभे करणो ही माङया खासगी जीवनात उघड ढवळाढवळ आहे, असेही त्याने म्हटले. (वृत्तसंस्था)
 
- न्यायालयात हा दावा दाखल करून रजनीकांत याने दोन गोष्टी प्रथमच केल्या आहेत. एक म्हणजे त्याने स्वत: न्यायालयात दाद मागितली व ते करताना त्याने आपल्या फिल्मी नव्हे तर मूळ नावाचा वापर केला. 
 
- दुसरे असे की, कोणाही ‘सेलिब्रिटीने’ त्याचे खासगी जीवन सार्वजनिक प्रतिमेहून भिन्न असते हे तत्त्व स्वीकारून त्यात कोणीही नाक खुपसू नये यासाठी कायदेशीर मार्ग स्वीकरण्याचीही ही बहुधा पहिलीच वेळ आहे. 

 

Web Title: Rajinikanth stopped the film in his own life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.