10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 14:15 IST2025-06-29T14:13:36+5:302025-06-29T14:15:06+5:30

Rajasthan High Court Peon Recruitment 2025: राजस्थान उच्च न्यायालयात शिपाई भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Rajasthan High Court Peon Recruitment 2025 Class 10th Pass Eligible | 10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

उच्च न्यायालयातनोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राजस्थानउच्च न्यायालयात शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मोहिमेद्वारे ५५०० हून अधिक पदे भरली जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार राजस्थान उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 

या भरती मोहिमेंतर्गत एकूण एकूण ५७२८ पदे भरली जाणार आहेत, ज्यात शिपाईची ५६७० पदे आणि चालकाची ५८ पदे समाविष्ट आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०२५ आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून १० वी उत्तीर्ण असायला हवा आणि त्याला हिंदी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असावे. दरम्यान, १८ ते ४० वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, एमबीसी, ईडब्ल्यूएस पुरुष उमेदवारांना वयोमर्यादेत पाच वर्षे सूट दिली जाईल. सामान्य आणि ईडब्ल्यूएस महिला उमेदवारांना वयोमर्यादेत पाच वर्षे सूट दिली जाईल.

किती पगार मिळेल?
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या दोन वर्षांसाठी १२४०० रुपये पगार मिळेल. दोन वर्षांनंतर उमेदवारांना लेव्हल १ अंतर्गत १७७०० ते ५६२०० रुपये दरमहा पगार दिला जाईल. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी राजस्थान उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

Web Title: Rajasthan High Court Peon Recruitment 2025 Class 10th Pass Eligible